Video | ना लोकांची भीती, ना नवरीची चिंता, भर मंडपात तंबाखू खाणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरदेव भर मंडपात तंबाखू चोळत आहे. तंबाखू खातानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Video | ना लोकांची भीती, ना नवरीची चिंता, भर मंडपात तंबाखू खाणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल
viral video

मुंबई : काही लोकांना आपल्या सवयी सुटता सुटत नाहीत. कोणत्याही ठिकाणी गेले तरी हे लोक आपल्या सवयींना चिटकून राहतात. लोकांच्या याच विचित्र सवयींचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरदेव भर मंडपात तंबाखू चोळत आहे. तंबाखू खातानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (Groom eating Tobacco in marriage function video went viral on social media)

भर मंडपात नवरदेव तंबाखू चोळतोय

सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ हे चांगलेच मजेदार असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका लग्न समारंभातील आहे. या लग्न सोहळ्यात अनेक लोक जमलेले आहेत. मंडपात नवरदेव आपले मित्र तसेच नातेवाईक यांच्यासोबत बसला आहे. नवरेदवाचा शाही थाट पाहण्यासारखा आहे. त्याने आपल्या डोक्याला बाशिंग बांधले आहे. डोक्यावर टोप आहे. तसेच नवरदेवाने गळ्यात शेला घातलेला आहे.

योग्य वेळ साधत तंबाखू तोंडात टाकली

मात्र, यावेळी हा नवरदेव शांत बसलेला नाही. तर भर मंडपात हा नवरदेव थेट तंबाखू चोळतोय. यावेळी लग्न समारंभात पाहुणे असतील, आपण तंबाखू चोळणे बरोबर आहे का ? याची या नवरदेवाला कसलीही चिंता नाहीये. अत्यंत हुशारीने नवरदेवाने तंबाखू चोळून योग्य वेळ साधत त्याने तंबाखूला थेट तोंडात टाकलं आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओमधील नवरदेवाची हिम्मत पाहून नेटकऱ्यांनी त्याला चांगलीच दाद दिली आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला ‘tube.indian’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. लोक या व्हिडीओला पाहून चांगलेच हसत आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | पाण्यात व्यायाम करण्याचा महिलेकडून प्रयत्न, पण ऐनवेळी भलतंच घडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | डोक्यावर पदर, अंगावर केशरी साडी, महिलेच्या ठुमक्यांनी नेटकरी घायाळ

Video | इकडे पतीने पत्नीला मिठीत घेतलं, तिकडे कुत्रा रुसला, पाहा व्हायरल व्हिडीओ

(Groom eating Tobacco in marriage function video went viral on social media)