Video | पाण्यात व्यायाम करण्याचा महिलेकडून प्रयत्न, पण ऐनवेळी भलतंच घडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ

लोकांच्या या कारनाम्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अगदीच स्पेशल आहे. या व्हिडीओमधील महिलेला पाण्यामध्ये व्यायाम करणे चांगले भोवले आहे.

Video | पाण्यात व्यायाम करण्याचा महिलेकडून प्रयत्न, पण ऐनवेळी भलतंच घडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ
VIRAL VIDEO
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jun 17, 2021 | 3:46 PM

मुंबई : काहीतरी वेगळं करुन दाखवण्याच्या वेडापायी लोक कधी काय करतील हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी काहीजण नेहमीच काहीतरी खटपट करत राहतात. लोकांच्या या कारनाम्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अगदीच स्पेशल आहे. या व्हिडीओमधील महिलेला पाण्यामध्ये व्यायाम करणे चांगले भोवले आहे. (Women doing exercise in water and fell down video went viral on social media)

महिलेचा पाण्यात व्यायाम 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पाण्यामध्ये व्यायाम करण्याचा प्रयत्न करतेय. यावेळी स्वीम सूट घालून ही महिला डोके खाली आणि पाय वर करुन कसरत करते आहे. पाण्यात कसरत करत असल्यामुळे ती नक्कीच काहितरी वेगळं करेल असं आपल्याला सुरुवातीला वाटते. कसरत करताना या महिलेमध्ये सुरुवातीला आत्मविश्वास दिसतोय. ही महिला डोकं खाली आणि पाय वर करते आहे.

महिला थेट पाण्यात पडली

या महिलेने अर्धा टास्क पूर्ण देखील केला आहे. मात्र, अचानकपणे काहितरी घोळ झाला आहे. पाय वर करताना या महिलेचा एकदम तोल गेला आहे. तोल गेल्यामुळे ही महिला थेट पाण्यात पडली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर तो काही क्षणांत व्हायरल झाला आहे. सध्या या व्हिडीओची समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजलेले नसले तरी महिलेची झालेली फजिती ही हसवणारी असल्यामुळे नेटकरी या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. ‘Hold My Beer’ या ट्विटर अकाऊंटवर हा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

इतर बातम्या :

Video | डोक्यावर पदर, अंगावर केशरी साडी, महिलेच्या ठुमक्यांनी नेटकरी घायाळ

Video | इकडे पतीने पत्नीला मिठीत घेतलं, तिकडे कुत्रा रुसला, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | पत्नी चहा द्यायला आली अन् भलतंच घडलं, पतीही चांगलाच संतापला, पाहा मजेदार व्हिडीओ

(Women doing exercise in water and fell down video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें