Video | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय ?

यावेळी अशाच प्रकारची मदत मागणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस पैशांची नाही तर जीव वाचवण्यासाठी मला मदत करा असे म्हणतो

Video | हृदय चिरण्यासाठी बायको लागली मागे, पतीकडून मदतीची याचना, जाणून घ्या नेमका प्रकार काय ?

मुंबई : सोशल मीडियाचं विश्व मोठं व्यापक आहे. या मंचावर जेवढ्या चांगल्या गोष्टी, तेवढ्याच वाईटही आहेत. कशाची मदत हवी असेल किंवा आजारपणासाठी पैशांची गरज असेल तर लोक सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मदतीसाठी आवाहन करतात. या आवाहनला सोशल मीडियाच्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. यावेळी अशाच प्रकारची मदत मागणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस पैशांची नाही तर जीव वाचवण्यासाठी मला मदत करा असे म्हणतोय. (scared man running on highway to save his life from his wife video went viral on social media)

माणूस जिवाच्या आकांताने रस्त्यावर धावतोय

सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक माणूस दिसतोय. तो एका महामार्गावर जिवाच्या आकांताने धावताना दिसतोय. सोबतच आपला सेल्फी कॅमेरा सुरु करुन तो बोलतो आहे. व्हिडीओमध्ये तो अत्यंत भेदरलेला दिसतोय. तशाच घाबरलेला अवस्थेत तो रस्त्यावर पळत असल्याचे दिसतेय.

माणूस नेमका का घाबरला ?

या व्हिडीओमध्ये तो लोकांना मदत करण्याचे आवाहन करतोय. तो माझा जीव धोक्यात असून मला वाचवा असे म्हणतोय. हा व्हिडीओ सुरुवातीपासून पाहिल्यावर आपल्यालाही हा माणूस अत्यंत घाबरलेला असून त्याची मदत करावी असेच वाटेल. मात्र, तो रस्त्याने का पळतोय हे समजल्यावर तुम्हाला चांगलेच हसू फुटेल.

हृदय चिरण्यासाठी पाठलाग

हा माणूस आपल्या पत्नीला चांगलाच घाबरलेला आहे. पत्नी मागे लागल्याचे तो सांगतोय. “मी आग्रा शहराच्या बाहेर आलो असून मी रस्त्याने पळतो आहे,” असे तो व्हिडीओमध्ये सांगतोय. काल बायको जवळ बसलेली असताना तिने तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता ? असा प्रश्न या माणसाच्या पत्नीने त्याला विचारला. त्यानंतर या माणसाने आपल्या पत्नीला ‘दिल चीर के देख तेराही नाम होगा’ असे मजेत उत्तर दिले. त्यानंतर या माणसाची पत्नी त्याचे हृदय चिरुन पाहण्यासाठी त्याच्या मागे लागली आहे, असे व्हिडीओतील माणूस सांगतोय.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Vipul Mittal (@vittyvipul)

व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा मजेदार व्हिडीओ vittyvipul या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून लोक त्याला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. तसेच व्हिडीओ पाहून नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | नवा शेखचिल्ली ! एका क्षणात झाड तोडलं, नंतर जे झालं ते एकदा पाहाच

नातवंडे पाहण्याची आईला हौस, लेस्बियन मुलीला दिले थेट शुक्राणूंचे इंजेक्शन

Video | लग्न उरकून थेट पाणीपुरीच्या ठेल्यावर, नव्या जोडीचा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

(scared man running on highway to save his life from his wife video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI