AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाईट ड्यूटीला गेला पती, रात्री बायकोने असे कांड केले की… सकाळी नवऱ्याला भरली धडकी, नेमकं काय घडलं?

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नवरा नाईट शिफ्टला गेल्यानंतर बायकोने एका रात्रीत असे काही केले की सर्वांनाच धडकी भरली. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

नाईट ड्यूटीला गेला पती, रात्री बायकोने असे कांड केले की... सकाळी नवऱ्याला भरली धडकी, नेमकं काय घडलं?
karnataka-motherImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 05, 2025 | 12:06 PM
Share

एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नवरा नाईट शिफ्टला गेला होता. जाताना त्याने बायकोला आणि मुलीला निरोप दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमी प्रमाणे घरी परतला. पण घराचे दार उघडल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्याच्या बायकोने असं काही केले की पोलीसही हादरले आहेत. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…

नेमकं काय घडलं?

कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यात एका आईने आधी आपल्या 12 वर्षांच्या मुलीची हत्या केली आणि मग स्वतः फासावर लटकून आपला जीव संपवला. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ही महिला मानसिक तणाव आणि आजाराने त्रस्त होती. ही घटना शिवमोग्गा येथील सरकारी रुग्णालयात असलेल्या नर्स क्वार्टरमध्ये घडली. मृत महिलेचे नाव श्रुती (38) असे होते, जी आपल्या पती आणि मुलगी पूर्विका यांच्यासह तिथेच राहत होती. तिचा पती रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता आणि बऱ्याचदा रात्रीच्या ड्युटीवर असायचा. या घटनेच्या रात्रीही तो ड्युटीवर होता.

वाचा: गौतमी पाटीलची दर महिन्याची कमाई किती? आकडा वाचून फुटेल घाम

रात्री जेव्हा पती घरी नव्हता, तेव्हाच श्रुतीने आपल्या मुलीची हत्या केली. असे सांगितले जाते की तिने मुलीच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तूने वार केले. यामुळे त्या निरागस मुलीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर श्रुतीने स्वतःला फासावर लटकवले.

पती ड्युटी संपवून घरी परतला तेव्हा…

सकाळी जेव्हा पती ड्युटी संपवून घरी परतला, तेव्हा त्याला दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. त्याने खूप प्रयत्न केले, पण दरवाजा उघडला नाही. घाबरून त्याने शेजाऱ्यांची मदत घेतली आणि दरवाजा तोडला. आतले दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. जमिनीवर मुलगी पूर्विकाचा रक्ताने माखलेला मृतदेह पडला होता आणि त्याच्यावर फासावर लटकलेल्या श्रुतीचा मृटदेह टांगलेला होता.

मुलगी पूर्विका सहाव्या इयत्तेत शिकत होती आणि अभ्यासात हुशार होती असे सांगितले जाते. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण शाळेत आणि परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच, कुटुंबीय आणि नातेवाइकांना या दुर्घटनेवर विश्वास ठेवणेही कठीण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. प्राथमिक अहवालात समोर आले आहे की, श्रुती बऱ्याच काळापासून मानसिक समस्यांनी त्रस्त होती. याच कारणामुळे तिने हे भयानक पाऊल उचलले असावे, असे मानले जाते. सध्या पोलिसांनी खून आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि या घटनेमागे आणखी काही कारणे तर नाहीत याचाही तपास करत आहेत.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.