
जगातील अनेक देशांच्या गाड्या त्यांच्या प्रवासासाठी ओळखल्या जातात. काही तुम्हाला सुंदर प्रवास घडवतात, तर काही तुम्हाला सर्वात भीतीदायक अनुभवही देतात. मॉरीतानिया देशात एक अशी ट्रेन आहे ज्यामध्ये आपल्याला प्रवासासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागू शकतो.
200 हून अधिक डब्यांच्या या गाडीत प्रवाशांसाठी एक डबाही आहे. पण या ट्रेनमधून प्रवास करणं हा काही लहान मुलांचा खेळ नाही.
ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी ट्रेनमध्ये एकही सीट नसल्यानं लोकांना लोखंडाच्या वरती बसावं लागतं. पण या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ फार कमी आहे.
अनेकदा लोक आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किंवा दूर राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी या ट्रेनचा वापर करतात.
‘बीबीसी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लोकांना डब्यातून प्रवास करण्यासाठी पैसेही मोजावे लागत नाहीत. इथले तापमान 49 अंश सेल्सिअस ते शून्य अंश सेल्सिअसपर्यंत आहे.
ही रेल्वे आफ्रिकन देशात धावते आणि 1963 मध्ये सुरू झाली. या ट्रेनचं नाव ट्रेन डू डेझर्ट असे असून ते 20 तासांत सुमारे 704किलोमीटरचा प्रवास करते. सहारा वाळवंटातून जाणाऱ्या या गाडीची लांबी सुमारे 2 किलोमीटर आहे.