AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Holidays in September 2022 | सप्टेंबरमध्ये इतक्या दिवस बँका बंद, कामे लवकर घ्या उरकून

Bank Holidays in September 2022 | सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांशी संबंधित महत्वाची कामे लवकर उरकून घ्या.

Bank Holidays in September 2022 | सप्टेंबरमध्ये इतक्या दिवस बँका बंद, कामे लवकर घ्या उरकून
बँकांचे शटर डाऊनImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 01, 2022 | 11:51 AM
Share

Bank Holidays in September 2022 | ऑगस्ट महिन्याच्या(August) अखेरीस लाडक्या बाप्पांचे आगमन झाले आहे. आता सप्टेंबर महिन्यात लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा करुन त्यांना निरोप देण्यात येणार आहे. तर इतर ही सण या महिन्यात येत आहेत. त्यामुळे बँकांना सुट्या (Bank Holidays) असतील आणि या काळात बँकांचे कामकाज होणार नाही. सप्टेंबर महिन्यात (September) बँका 13 दिवस बंद राहतील. बँकांतील व्यवहार आणि कामे सर्वांनाच करावी लागतात. त्यामुळे सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. माहिती असल्याने अत्यावश्यक कामे तुम्हाला लवकर पूर्ण करता येतील. बँका बंद राहणार असल्या तरी देशभरात सर्वच ठिकाणी एकाचवेळी बँका बंद राहणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही सुट्ट्या प्रादेशिक आहेत. याचा अर्थ काही राज्यांमध्ये काही दिवस फक्त बँका बंद राहतील पण इतर राज्यांमध्ये सर्व बँकांचे कामकाज (Bank Working) नेहमीप्रमाणे सुरू राहील.

सुट्यांचे गणित काय

केंद्रीय बँक तीन श्रेणीत लक्षात घेत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम (negotiable instrument act), तात्काळ पैसे पाठविणे (real time gross settlement) आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी (Bank closing Account) याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी आहे. या सुट्या शनिवारी आणि रविवारपेश्रा वेगळ्या असतील. दिवाळी आणि दस-यासारख्या सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.

ऑनलाईन बँकिंग सेवा सुरळीत

बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील.

सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in September 2022)

1 सप्टेंबर : गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) – पणजीत बँका बंद 4 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी) 6 सप्टेंबर: कर्मपूजा – रांचीमध्ये बँका बंद 7 सप्टेंबर: पहिला ओणम – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद 8 सप्टेंबर: थिरुओनम- कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद 9 सप्टेंबर: इंद्रजात्रा-गंगटोकमध्ये बँक बंद 10 सप्टेंबर: शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), श्री नरवण गुरु जयंती 11 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी) 18 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी) 21 सप्टेंबर: श्री नरवणे गुरु समाधी दिन – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद 24 सप्टेंबर: शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार) 25 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी) 26 सप्टेंबर: नवरात्री स्थापना / लॅनिंगथौ सन्माही चौरेन हौबा – इम्फाळ आणि जयपूरमध्ये बँका बंद

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?