Cryptocurrency Price: बिटकॉईनच्या दरात रेकॉर्डब्रेक उसळी, जाणून घ्या नेमकं काय झालं?

Cryptocurrency Price | Cardano या क्रिप्टोकरन्सीची किंमत गेल्या 24 तासांमध्ये 11 टक्क्यांनी वाढली आहे. तर Ethereum या क्रिप्टोकरन्सीचा दर 10 टक्क्यांनी वाढून 2383 डॉलर्सवर जाऊन पोहोचला. Tether आणि Binance Coin या दोन्ही क्रिप्टोकरन्सीच्या दरात अनुक्रमे एक व सात टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

Cryptocurrency Price: बिटकॉईनच्या दरात रेकॉर्डब्रेक उसळी, जाणून घ्या नेमकं काय झालं?
बिटकॉईन
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 12:45 PM

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी Bitcoin सह अनेक क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीमध्ये रेकॉर्डब्रेक उसळी पाहायला मिळाली आहे. सोमवारी एका Bitcoin चा भाव 38500 डॉलर्स म्हणजे 29 लाखांवर जाऊन पोहोचला. Bitcoin च्या भावात 12 टक्के वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत क्रिप्टोकरन्सीसंदर्भात सातत्याने चांगल्याप्रकारची वातावरणनिर्मिती झाल्याने ही उसळी पाहायला मिळत आहे.

Cardano या क्रिप्टोकरन्सीची किंमत गेल्या 24 तासांमध्ये 11 टक्क्यांनी वाढली आहे. तर Ethereum या क्रिप्टोकरन्सीचा दर 10 टक्क्यांनी वाढून 2383 डॉलर्सवर जाऊन पोहोचला. Tether आणि Binance Coin या दोन्ही क्रिप्टोकरन्सीच्या दरात अनुक्रमे एक व सात टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. याशिवाय, USD Coin, Dogecoin, Polkadot आणि Binance USD या क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीमध्येही वाढ नोंदवली गेली.

क्रिप्टोकरन्सी ठरणार सोन्याला पर्याय?

आगामी काळात क्रिप्टोकरन्सी हा सोन्याला पर्याय ठरू शकेल, अशीही चर्चा रंगू लागली आहे. लोक सोन्यातील पैसे काढून क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करत असल्याने सोन्याचे दर पडत आहेत, अशीही एक वदंता आहे. सोन्याच्या तुलनेत क्रिप्टोकरन्सी हा सध्या तितकासा स्वीकारार्ह पर्याय नसला तरी आगामी काळात ही परिस्थिती बदलेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

Amazon कडून लवकरच क्रिप्टोकरन्सीतील व्यवहारांना सुरुवात

बिटकॉईन आणि अन्य क्रिप्टोकरन्सीचा वाढता वापर पाहता अ‍ॅमेझॉन कंपनीकडून आता ग्राहकांना बिटकॉईन किंवा तत्सम क्रिप्टोकरन्सीचा वापर करून व्यवहार करण्याची मुभा देण्यात येणार आहे. अ‍ॅमेझॉनकडून सध्या पेमेंट टीमसाठी डिजिटल करन्सी आणि ब्लॉकचेन एक्सपर्टची भरती केली जात आहे. कंपनीचे यासंबंधीचे धोरण विकसित करण्यासाठी अ‍ॅमेझॉन सध्या या क्षेत्रातील जाणकार नेतृत्वाच्या शोधात आहे.

यापूर्वी अ‍ॅपल कंपनीने मे महिन्यात डिजिटल करन्सीचे ज्ञान असलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर या पदासाठी भरती सुरु केली होती. या व्यक्तीने डिजिटल वॉलेट, बीएनपीएल, फास्ट पेमेंटस, क्रिप्टोकरन्सी आणि तत्सम पर्याय विकसित करण्यासाठी काम करणे अपेक्षित होते. याशिवाय, ट्विटर आणि टेस्ला या कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सी हे भविष्य असल्याचे संकेत दिले आहेत. ऑनलाईन विश्वाला क्रिप्टोकरन्सीसारख्या वैश्विक चलनाची गरज आहे. आमचं लक्ष हे बिटकॉईन असेल. कारण या माध्यमातून जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल, असे ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी म्हटले होते.

इतर बातम्या:

चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत 3.3 टक्के घट, व्यापार तूट कमी करण्यास मदत

Gold: अबब! कोरोनाच्या संकटकाळातही भारतात इतक्या टन सोन्याची आयात

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.