AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price: दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात घसरण, सोनं रेकॉर्ड स्तरापेक्षा 4000 रुपयांनी स्वस्त

गेल्यावर्षीच्या याच कालावधीची तुलना केल्यास सध्या सोने जवळपास 4 हजारांनी स्वस्त आहे. गेल्या वर्षी MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत या दिवशी 51,079 रुपये होती, आज सोन्याची किंमत 47,765 रुपये आहे. याचा अर्थ विक्रमी पातळीपेक्षा 3,314 रुपयांनी स्वस्त विकले जात आहेत. | Gold price

Gold Price: दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात घसरण, सोनं रेकॉर्ड स्तरापेक्षा 4000 रुपयांनी स्वस्त
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 27, 2021 | 11:30 AM
Share

मुंबई: दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. बुधवारी मल्टी कमोडिटी (MCX) वर सोन्याच्या किंमतीत 0.10 टक्क्यांनी घट झाली आहे. या घसरणीनंतर सोने 47,765 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे. तर आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदी 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 65050 रुपये प्रतिकिलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

गेल्यावर्षीच्या याच कालावधीची तुलना केल्यास सध्या सोने जवळपास 4 हजारांनी स्वस्त आहे. गेल्या वर्षी MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत या दिवशी 51,079 रुपये होती, आज सोन्याची किंमत 47,765 रुपये आहे. याचा अर्थ विक्रमी पातळीपेक्षा 3,314 रुपयांनी स्वस्त विकले जात आहेत.

सोन्याचा भाव 50 हजारांपर्यंत जाणार?

सोन्याच्या सध्याच्या किंमती पाहता, आता सोन्यात गुंतवणूक करायची की थांबवायची, असा प्रश्न गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांच्या मोठ्या वर्गासमोर आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही काळापासून सोन्याच्या किxमतीत सातत्याने वाढ होत आहे. सोन्याची मागणी अशीच वाढत राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 50,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आत्ताच सोने खरेदी केल्यास तुमचे बरेच पैसे वाचू शकतात.

यंदाच्या दिवाळीत सोनं स्वस्तात मिळणार?

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोनं स्वस्त राहण्याचा अंदाज नाशिकमधील सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात सोन्याचा प्रतितोळा दर 51000 रुपये इतका होता. मात्र, यंदा सोन्याचा प्रतितोळा दर 47000 ते 47500 रुपये इतका असेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

सोन्याचा भाव 57 हजार रुपयांवरून 60 हजार रुपयांपर्यंत जाणार

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव 57 हजार रुपयांवरून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच सध्या सुरू असलेल्या किमती 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. चांदीचा विचार केल्यास त्यातही मोठी वाढ होऊ शकते. दिवाळीपर्यंत किंवा वर्षअखेरीस चांदीचे भाव 76,000 ते 82,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत जातील, असे बहुतांश व्यापाऱ्यांचे मत आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासता येईल?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.

संबंधित बातम्या

सॉवरेन गोल्ड बाँडची नवी योजना सुरू, सोने खरेदीसाठी याहून चांगला ‘मुहूर्त’ नाही, हे आहे कारण

LPG च्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक स्वयंपाक स्वस्त, ई-कूकिंग किती किफायतशीर?

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?