AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO खातेधारकांसाठी खूशखबर! इमर्जन्सीमध्ये काढा 1 लाख/- दिवसाची प्रक्रिया 60 मिनिटांत

ईपीएफने कोरोनाच्या वेळी उपचारांच्या सोयीसाठी ही विशेष व्यवस्था सुरू केली होती. मात्र आता इतर आजारांच्या उपचारांसाठीही याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एखादी व्यक्ती गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल असेल आणि त्याला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल, तर तो त्याच्या खात्यात एक लाख रुपये सहज ट्रान्सफर करू शकतो

EPFO खातेधारकांसाठी खूशखबर! इमर्जन्सीमध्ये काढा 1 लाख/- दिवसाची प्रक्रिया 60 मिनिटांत
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 7:59 PM
Share

नवी दिल्ली : वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पीएफ खात्यातील पैसे तारणहार ठरतात. नव्या ईपीएफओ नियमानुसार, वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत एक लाखांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करता येणार आहे. त्यामुळे खातेधारक कोणत्याही कागदपत्रांच्या प्रक्रियेशिवाय एक लाख रुपयांची रक्कम काढू शकणार आहे. नव्या नियमांमुळे कोट्यावधी ईपीएफओ खातेधारकांना लाभ होणार आहे.

सुधारित नियमानुसार PF खात्यातून पैसे काढण्याच्या अटी?

खातेधारकाला सरकारी/ CGHS पॅनेल रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असावे. खासगी रुग्णालयांच्या स्थितीत, प्राथमिक चौकशी करुन पैसे काढण्यास मान्यता दिली जाईल. जर कामकाजाच्या दिवशी अर्ज दाखल केल्यास, पैसे तत्काळ दुसऱ्या दिवशी वर्ग करण्यात येतील. पैसे कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक खात्यात किंवा रुग्णालयाच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील.

पीएफ खात्यातून पैसे काढण्याची ‘ए टू झेड’ प्रक्रिया:

1. अधिकृत वेबसाईट www.epfindia.gov.in वर भेट द्या. 2. ‘ऑनलाईन सर्व्हिस’वर क्लिक करा. 3. फॉर्म 31, 19, 10C आणि 10D भरा. 4. आता, अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक एन्टर करा. 5. ‘ऑनलाईन क्लेम साठी प्रक्रिया’ वर क्लिक करा. 6. ड्रॉप-डाउन मेन्यूमधून फॉर्म 31 निवडा. 7. पैसे काढण्याचे कारण एन्टर करा. 8. रक्कम एन्टर करा आणि तुमच्या हॉस्पिटल बिलाची कॉपी अपलोड करा. 9. तुमचा अ‍ॅड्रेस एन्टर करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा

तीन दिवसांची प्रक्रिया तासावर:

ईपीएफने कोरोनाच्या वेळी उपचारांच्या सोयीसाठी ही विशेष व्यवस्था सुरू केली होती. मात्र आता इतर आजारांच्या उपचारांसाठीही याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एखादी व्यक्ती गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल असेल आणि त्याला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल, तर तो त्याच्या खात्यात एक लाख रुपये सहज ट्रान्सफर करू शकतो. पूर्वीच्या उपचारांप्रमाणेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पैशांची गरज भासल्यास त्यासाठी वैद्यकीय बिले सादर करावी लागत होती. आता त्याची गरज नाही आणि पूर्वी पीएफचे पैसे मिळण्यासाठी 3 दिवस लागायचे, ते आता एक तासावर आले आहे.

इतर बातम्या –

आधार कार्डची सद्यस्थिती जाणून घ्यायची आहे? असे तपासा Status ऑनलाईन

मतदार ओळखपत्राशिवाय मतदानाचा हक्क बजावू शकता! या 11 कागदपत्रांपैकी एकाची आवश्यकता 

आधार कार्डशी संबंधित व्यवहारांवर मर्यादा, Micro ATM आणि POS मशीन वर दिवसातून 5 वेळा काढता येणार रक्कम

गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.