AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधार कार्डशी संबंधित व्यवहारांवर मर्यादा, Micro ATM आणि POS मशीन वर दिवसातून 5 वेळा काढता येणार रक्कम

AePS Transaction: एईपीएसशी जोडलेल्या  मायक्रो एटीएम अथवा पीओएस मशीनवर ग्राहकाला दिवसातून जास्तीत जास्त 5 वेळा रोख रक्कम काढता येईल. या व्यवहारांसाठी  बँक खाते क्रमांकाची आवश्यकता नसते. मशीनवर  बोटांचा ठसा(Thumb Impression) उमटविला  तर ग्राहकाला रक्कम काढता येते.

आधार कार्डशी संबंधित व्यवहारांवर मर्यादा, Micro ATM आणि POS मशीन वर दिवसातून 5 वेळा काढता येणार रक्कम
डिजिटल आधार: एकाच अ‍ॅपमध्ये पाच प्रोफाईल लिंक
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 2:24 PM
Share

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPSI) आधारशी संबंधित व्यवहारांसाठी (AePS Transaction) मर्यादा निश्चित केली आहे. आता ग्राहकाला आधार संचालित पेमेंट यंत्रणेतून दिवसभरात मोजक्या व्यवहाराची मर्यादा घालून देण्यात आली आहे. यापूर्वी व्यवहाराची मर्यादा  ५०,००० रुपये निश्चित करण्यात आली होती, त्यानंतर या नव्या नियमाची भर पडली आहे.   मायक्रो एटीएम (Micro ATM) किंवा पीओएस मशीन (POS) सारख्या आधार संचालित मशीनद्वारे लोकांना त्यांच्या रोख गरजा पूर्ण करणे शक्य झाल्याने कोरोना कालावधीत आधार(Adhar Card Transaction) व्यवहारांची सुविधा खूप वेगाने वाढली आहे.

एनपीसीआयने आधारकार्ड मार्फत रोख रक्कम काढणे आणि मिनी स्टेटमेंटची मर्यादा निश्चित केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आधार (बँक सुविधा एजन्सी) आणि  ग्राहकांकडून मायक्रो एटीएम किंवा पीओएस मशीन चालविणाऱ्या बँका यांना या नव्या नियमानुसार

दररोज प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त 5 वेळा रोख रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

5  वेळा काढा रोख रक्कम

प्रत्येक ग्राहकाला दरमहा किमान 5 वेळा रोख रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.

तसेच  एटीएम किंवा पीओएस मशीनमधून किमान 5 वेळा मिनी स्टेटमेंट उपलब्ध होतील. एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, हे संबंधित नियम १५ जानेवारी २०२२ रोजी पासून लागू होतील. हा व्यवहार आधार सक्षम पेमेंट सिस्टीम किंवा एनपीसीआयने विकसित केलेल्या ईपीएसद्वारे केला जाईल . एईपीएस ही एक प्रणाली आहे जी ग्राहकांना त्यांचा आधार क्रमांक आणि त्यांचे बोटांचा ठसे किंवा आयरिस स्कॅन यांचा पडताळा करून मायक्रो एटीएम किंवा पीओएस मशीनमधून रक्कम काढण्याची मूभा देते

5 मिनी स्टेटमेंट काढता येतील

Businessline.com च्या अहवालानुसार जर व्यवसाय प्रतिनिधी, एजंट आणि व्यापारी यांच्या माध्यमातून आधारद्वारे पैसे काढले गेले तर ग्राहकाला दुहेरी  पडताळा करणे आवश्यक आहे. यासाठी आधार बायोमेट्रिक पडताळणीचा वापर केला जाईल. एनपीसीआयने मार्च 2021 मध्ये बँकांना एका महिन्यात प्रत्येक ग्राहकामागे 5 मिनी स्टेटमेंटचा नियम लागू केले होते. 5 वेळा, जर ग्राहकाला मिनी स्टेटमेंट हवे असेल, तर एकतर बँक नकार देते किंवा अतिरिक्त शुल्क आकारते. आधार व्यवहारांशी संबंधित अनेक मोठ्या बँकांनी प्रत्येक ग्राहकामागे रोख रक्कम काढण्यासाठी ही मर्यादा निश्चित केली आहे.

एईपीएस व्यवहार म्हणजे काय 

कोणत्याही एपीएसशी जोडलेल्या मायक्रो एटीएममधून ग्राहक प्रत्येक व्यवहारामागे 10,000 रुपयांपर्यंत रोख रक्कम काढू शकतो. कोविड-19 एईपीएसमधून रोख रक्कम काढण्याची प्रथा वेगाने वाढली आहे. डिसेंबर 2021 मध्ये एईपीएसच्या माध्यमातून 9.6 व्यवहार करण्यात आले जेथे 25,860.92 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. ज्या बँक खात्याशी आधार या सुविधेशी जोडलेला आहे, त्या खात्यातून पैसे काढले जातात. आधारशी संबंधित व्यवहारासाठी बँक खाते क्रमांकाची आवश्यकता नसते. आधार क्रमांक लोकांना एका बँकेतून दुसऱ्य बँकेत पैसे पाठविण्याची किंवा पैसे मिळविण्याची परवानगी देतो. या व्यवहारासाठी खातेदाराला फक्त त्याचे बोटांचे ठसे द्यावे लागतात.

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना