AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपंचमीला गालबोट, उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; अनेक भक्त गंभीर जखमी

उज्जैनमध्ये नागपंचमीला गालबोट लागल्याची घटना घडली. यात उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात भक्तांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आलं आहे.

नागपंचमीला गालबोट, उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; अनेक भक्त गंभीर जखमी
Stampede news Image Credit source: tv9
| Updated on: Aug 17, 2026 | 2:33 PM
Share

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली आहे. त्याचबरोबर वर्षांतून एकदाच उघडण्यात येणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिरातही दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली. दर्शनाला सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात बॅरिकेट्सजवळ गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली. त्यामुळे मंदिर परिसरात चेंगराचेंगरी परिस्थिती झाली. या घटनेने नागपंचमी सणाला गालबोट लागल्याचे बोललं जात आहे. मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मंदिर समितीने केली आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेने अनेक भाविकांची तब्येत बिघडली. अनेक भक्त बेशुद्ध झाल्याचेही समोर आलं. मंदिरात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयातही दाखल केलं आहे. आतापर्यंत या घटनेत 13 भाविक जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. श्रावणा महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भगवान महाकाल यांच्यासोबत नागचंद्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी सकाळपासून गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या मंदिरात सकाळपासून 5.50 लाख भाविकांनी दर्शन घेतलं आहे. त्यात नागचंद्रेश्वर मंदिर हे वर्षातून एकदाच उघडले जाते. त्यामुळे दरवर्षी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उज्जैनला येतात.

मंदिर समितीने चेंगराचेंगरीचं वृत्त फेटाळलं 

मंदिर समितीने चेंगराचेंगरीचं वृत्त फेटाळलं. भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मंदिर समितीने केलं आहे. नागपंचमी, श्रावण सोमवार आणि भगवान श्री महाकालेश्वर मंदिरात भक्तांची मोठी संख्या वाढली. आतापर्यंत 6.19 लाख भाविकांनी दर्शन घेतलं. या मंदिरात भाविकांनी अनेक रांगा लावल्या आहेत. भाविकांनी केवळ अधिकृत सूचनेवर विश्वास ठेवावा, अशी माहिती मंदिर समितीने दिली आहे.

नेमकं काय घडलं?

महाकाल मंदिरातील नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनाच्या रांगेत शॉक लागत असल्याची अफवा भक्तांमध्ये पसरली. त्यामुळे भक्त भयभीत झाले. तसेच हरिसिद्धी मंदिराच्या बॅरिकेट्सच्या जवळील डीपीजवळ देखील शॉक लागत असल्याची अफवा भक्तांमध्ये पसरली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी चेंगराचेंगरी सारखी निर्माण झाली. यावेळी भक्त एकमेकांच्या अंगावर पडले. या घटनेत अनेक भक्त जखमी झाले. त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना