जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; पण येथे एकही नाही हिंदू, कारण तरी काय?
Hindu Temple : हिंदू धर्म 12,000 वर्षांहून अधिक जुना असल्याचे मानले जाते. अनेक देशात सनातन धर्माच्या पाऊलखुणा दिसतात. असेच जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर या देशात आहे. पण तिथे हिंदू नाहीत.

जगातील अनेक देशात प्राचीन हिंदू मंदिर दिसतील. शिवलिंग दिसतात. काही देशात सनातन धर्म दिसत नसला तरी त्याची प्रतिकं सहज आढळतात. काही देशांच्या राष्ट्रध्वजात पण ही प्रतिकं दिसून येतात. हिंदू धर्म 12,000 वर्षांहून अधिक जुना असल्याचे मानले जाते. अनेक देशात सनातन धर्माच्या पाऊलखुणा दिसतात. असेच जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर या देशात आहे. पण तिथे हिंदू नाहीत.
कंबोडियातील अंकोरवाट मंदिर
अंकोरवाट मंदिर हे कंबोडियातील अंकोर येथे आहे. अंकोर शहर हे पूर्वी यशोधरपूर नावाने प्रसिद्ध होते. हे जगातील सर्वात मोठे प्राचीन धार्मिक स्थळांपैकी एक आहे. भगवान विष्णूसाठी हे मंदिर समर्पित आहे. या मंदिराची निर्मिती राजा सूर्यवर्मन द्वितीय याच्या कार्यकाळात सन 1112 ते 1153 मध्ये करण्यात आली. मंदिरातील दगडी चित्रे रामाची कहाणी सांगतात.सध्या जिथे हे मंदिर आहे तिथे पूर्वीच्या शासकांनी मोठी मंदिरे बांधली होती. १९८३ पासून कंबोडियाच्या झेंड्यातही या मंदिराला स्थान आहे. इतिहासतज्ज्ञांच्या मते, काही वर्षांपूर्वी कंबोडियात हिंदूची लोकसंख्या खूप अधिक होती. पण इतक्या वर्षात अनेक लोकांनी धर्म परिवर्तन केले. आता या देशात हिंदूचा टक्का अगदी नगण्य आहे. पण हा देश अजून सर्वात मोठ्या हिंदू मंदिरासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
या मंदिराभोवती 700 फूट रूंद खंदकाची चौफेर निर्मिती करण्यात आली आहे. दूरवरून पाहिल्यास हा खंदक एखाद्या तलावासारखा भासतो. हा खंदक पार करण्यासाठी पश्चिम बाजूला एका पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. या मंदिराच्या भिंतीवर रामायण चित्तारले आहे. कलाकारांनी भारतीय कला जिवंत ठेवण्यासाठी अपार मेहनत घेतल्याचे दिसून येते.
हे मंदिर तयार करण्यासंदर्भात अनेक कथा आहेत. असे सांगण्यात येते की, कंबोडियाची राजधानी नेहमी ऊर्जावान राहावी यासाठी राजा सूर्यवर्मन यांनी हे मंदिर तयार केले. त्यांनी याठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांच्या मूर्ती स्थापित केल्या. त्यांची पूजाअर्चना सुरू केली. 12 व्या शतकात हिंदू राजाने हे मंदिर तयार केले होते. पुढे 14 व्या शतकात बुद्ध शासन काळ सुरू झाला आणि तिथे भगवान बुद्धांची पण पूजा सुरू झाली. येथे अनेक बुद्ध भिक्खू ध्यान धारणा करतात. जगभरातील पर्यटक येथे भेट द्यायला येतात.
