AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संकटाच्या काळात रशिया मैत्री विसरला, शत्रूही असं वागणार नाही, पुतिन यांच्याकडून भारताबाबत मोठी घोषणा

इराण इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे हा तणाव निर्माण झालेला असतानाच आता रशियानं केलेल्या घोषणेमुळे भारत मोठ्या संकटात सापडला आहे.

संकटाच्या काळात रशिया मैत्री विसरला, शत्रूही असं वागणार नाही, पुतिन यांच्याकडून भारताबाबत मोठी घोषणा
Vladimir Putin Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 10:04 PM
Share

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यामुळे जगभरात भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. या इंधन टंचाईची झळ भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते त्यातील तब्बल 25 टक्के तेलाची वाहतूक ही एकट्या होर्मुज स्ट्रेटमधून होते. मात्र इराणने होर्मुज स्ट्रेट बंद केल्यामुळे आता अनेक तेलाचे टँकर या ठिकाणी अडकून पडले आहेत. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केल्यामुळे सध्या भारताला आपल्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे. आखाती देशांकडून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद झाल्यानंतर भारतानं आता पुन्हा एकदा आपला मोर्चा रशियाकडे वळवला आहे.

मात्र यावेळी रशियानं भारताला मोठा धक्का दिला आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी रशिया भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठी सूट देत होता. मात्र आता भारतावर इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मोठं इंधन संकट ओढावलं आहे. अशा संकटांच्या काळात रशिया मैत्री विसरला का? असा प्रश्न निर्माण होत आहे. रशिया युद्धाच्या संधीचा फायदा घेऊन जवळपास दुप्पट किंमतीने भारताला कच्च्या तेलाची निर्यात करत आहे. अमेरिकेनं सध्या अनेक देशांना रशियाकडून तेल खरेदीची परवानगी दिली आहे, त्यामुळे रशियाच्या कच्च्या तेलाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, सध्या याचाच फायदा रशिया घेताना दिसून येत आहे.

यावर बोलताना अमेरिकेच्या ऊर्जा संसाधन विभागाचे माजी असिस्टंट सेक्रेटरी एमोस होचस्टीन यांनी म्हटलं की, भारताला रशियाकडून काही आठवड्यापूर्वी ज्या दराने तेल मिळत होतं, त्या दरात आता रशियाने दुप्पटीने वाढ केली आहे. अमेरिका, इस्त्राय आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे, युद्धामुळे आखाती देशांकडून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताने रशियाकडे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याची मागणी केली, तेव्हा रशियानं भारताला स्पष्ट सांगितलं की, तुम्हाला आता गरज आहे, त्यामुळे आम्ही कच्च्या तेलाच्या दरात कुठल्याही प्रकारची सूट देणार नाही, आम्ही कच्च्या तेलावर प्रिमियम प्राइज लावू असा दावा देखील होचस्टीन यांनी केला आहे. दरम्यान युद्धापूर्वी रशिया भारताला कच्चे तेल प्रति बॅरल 50 डॉलरपेक्षा देखील कमी किमतीने द्यायचा. मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर आता रशिया भारताला कच्चे तेल प्रति बॅरल 90 डॉलरपेक्षा अधिक किमतीने विकत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल