मुख्यमंत्र्यांना अटक करणारी लेडी सिंघम; 20 वर्षांत 40 वेळा बदली, तिच्या नावानेच अनेकांना थरकाप, नाव माहिती आहे का?
IPS Arrested CM : तुम्हाला IAS, IPS चे स्वप्न खुणावत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि निडरपणा गरजेचा आहे. या लेडी सिंघमने तर थेट एका मुख्यमंत्र्यांनाच अटक केली होती. त्यांची 40 वेळा बदली झाली. त्यांचे नाव ऐकताच भल्यभल्यांना घाम फोडतो.

भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. या लेडी सिंघमकडे पाहून तर अनेक तरुणांना याक्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. IPS डी. रुपा. या नावाची दहशत भल्यभल्याना घाम फोडते. कारणही तसेच आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना अटक (IPS Arrested CM) करुन सर्वांनाच घाम फोडला होता. कोण आहेत डी. रुपा? कसा आहे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास
कोण आहेत IPS डी. रुपा?
IPS डी. रुपा या कर्नाटक येथील रहिवाशी आहेत. त्यांचे सर्व शिक्षण त्यांच्याच राज्यात पूर्ण झाले. त्यांनी कुवेम्पु विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. त्या हुशार होत्या. त्यांना या विद्यापीठातून त्यांनी सुवर्ण पदक मिळवले. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली होती.
प्रशासकीय सेवेची परीक्षा पास
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच त्यांनी प्रशासकीय सेवेची (Civil Service Exam) परीक्षी दिली. वर्ष 2000 मध्ये UPSC परीक्षेत त्यांनी 43 वी रँक मिळवली. त्यांनी पोलीस प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनी त्यात 5 वी रँक मिळवली. आयपीएस झाल्यानंतर त्यांनी देशातील अनेक भागात काम केले.
40 वेळा बदली
आयपीएस डी रुपा यांच्या मुलूखगिरीत त्यांनी चढउतार पाहिले. त्यांनी कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्यात नोकरी केली. 20 वर्षांच्या त्यांच्या करिअरमध्ये त्यांची जवळपास 40 वेळा बदली झाली. त्यांनी निडरपणे आणि ईमानदारीने काम केले आणि डंका वाजवला.
मुख्यमंत्र्यांना केली अटक
IPS Officer डी रूपा भारतात त्यावेळी चर्चेत आली, जेवहा त्यांनी मुख्यमंत्र्यांना अटक (IPS Arrested CM) केली. वर्ष 2007 मध्ये मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री उमा भारती यांना अटक केली. ही अटक कोर्टाच्या आदेशाने करण्यात आली होती. एका मुख्यमंत्र्याला अटक करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण डी रुपा यांनी त्यांचे कर्तव्य बजावले. कायद्याचे पालन केले.
समाज माध्यमांवर सक्रीय
डी रूपा सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्या त्यांचे अनुभव, छायाचित्र आणि चांगले कार्य लोकांसोबत शेअर करतात. त्यामुळे अनेक तरुणांना प्रसाशकीय सेवेत दाखल होण्याची ऊर्जा मिळते. डी. रूपा यांनी मॉडेलिंग पण केली आहे. त्यांची बहीण रोहिणी दिवाकर या पण एक सरकारी अधिकारी आहेत. त्या आयकर विभागात कार्यरत आहेत.
