AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Predictioin : पुढील 3 दिवसांत संकटांचा कहर! 4 देश होणार उदध्वस्त, बाबा वेंगांचा तो काय इशारा…

Baba Vanga Prediction : अखेर ती भीती खरी होण्याची शक्यता बळावली आहे. काल रशियाच्या द्वीप समूहाजवळ 8.8 तीव्रतेचा महाभूकंप आला. त्याने त्सुनामीची भीती वाढली आहे. जपान, रशिया आणि अमेरिकेतील अनेक बेटांना धोक्याचा इशारा अजून कायम आहे.

Baba Vanga Predictioin : पुढील 3 दिवसांत संकटांचा कहर! 4 देश होणार उदध्वस्त, बाबा वेंगांचा तो काय इशारा…
बाबा वेंगा भाकीत
| Updated on: Jul 31, 2025 | 9:40 AM
Share

Russia-Japan earthquake and tusnami : जपानमध्ये 5 जुलै रोजी त्सुनामीच्या लाटा येणार असा दावा करणाऱ्या वृत्तांनी खळबळ उडवली होती. त्यावेळी काहीच घडले नाही. पण आता रशियाच्या कामचटका द्वीपसमूहाजवळ 8.8 तीव्रतेचा महाभूकंपाने प्रशांत महासागरात खळबळ उडवली आहे. जपान, रशिया, अमेरिकेतील काही बेटांसह जगातील इतर समुद्रीय देशांना धोक्याचा इशारा अजूनही कायम आहे. जपानची बाबा वेंगा रिओ तात्सुकी हिची ती भविष्यवाणी खरी ठरणार का? या तीन देशांना पुढील चार दिवसांत धोक्याची घंटा देण्यात आली आहे.

रिओ तात्सुकीचे ते भाकीत खरं ठरणार?

जपानची मंगा कलाकार रिओ तात्सुकी (Ryo Tatsuki) हिने जपानमध्ये महाप्रलय येण्याचे भाकीत यापूर्वीच वर्तवले आहे. 5 जुलै रोजी त्सुनामी येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण तसे काही घडले नाही. त्यावेळी जपान शेजारील बेटांना भूकंपाचे तीव्र झटके बसले तर टोकियोला पावसाने झोडपून काढले. काल भल्या पहाटे रशियाजवळील द्वीपसमूहाजवळ महाभयंकर भूकंप आला. हे बेट जपानच्या शेजारी आहे. त्यातून त्सुनामीच्या लाटा उसळल्याचे सांगण्यात येत आहे.

रिओ तात्सुकी या लेखिका आणि चित्रकार आहेत. “The Future I Saw” (2021 मधील सुधारीत आवृत्ती) या पुस्तकात तिने जुलै 2025 मध्ये जपान आणि इतर काही देशांना नैसर्गिक संकटाचा मोठा सामना करावा लागेल, असे भाकीत केले आहे. या काळात समुद्रात गगनचुंबी लाटा उसळतील. 2011 मधील तोहोकू भूकंपापेक्षा अधिक विनाशकारी त्सुनामी येईल असे भाकीत तिने वर्तवले होते.

जपान, तैवान, इंडोनेशिया, उत्तरी मारियाना बेट समूह, व्हिएतनामसह अनेक देशांच्या किनारपट्यांना त्याचा फटका बसेल असे भविष्य तिने वर्तवलेले आहे. पण या 5 जुलै रोजी तिच्या भाकीतानुसार काहीच घडले नाही. पण अनेक जण जुलै अथवा ऑगस्ट महिन्यात अशा घटना घडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या देशांना त्सुनामीचा धोका

रशियाच्या कामचटका द्वीपसमूहाजवळ 8.8 तीव्रतेचा महाभूकंपाने प्रशांत महासागरात खळबळ उडवली आहे. काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निसर्गाच्या या रौद्ररुपाची भीती जगाला करून दिली. या महाभूकंपाला सहज, हलक्यात न घेण्याचे त्यांनी बजावले. हवाई बेटे, अलास्का आणि इतर अमेरिकेन राज्यातील किनारपट्यांना, रशियातील काही बेटांना, तर जपानला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. काल त्सुनामीच्या लाटा उसळल्या. त्याची उंची जास्त नव्हती. पण भूकंपाचे धक्के वाढल्यास येत्या तीन दिवसात या पट्ट्यात मोठा विद्धवंस होण्याची भीती व्यक्त होत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.