AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्यावर हॅटट्रिकच का होते? या शब्दामागचं नेमकं लॉजिक काय?

History of Hat-Trick in Cricket: क्रिकेटमध्ये, जेव्हा एखादा गोलंदाज सलग तीन चेंडूत तीन विकेट घेतो तेव्हा त्याला हॅटट्रिक म्हणतात. क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणे खूप कठीण मानले जाते. खूप कमी गोलंदाजांना ही कामगिरी करता येते. पण तुम्हाला हॅटट्रिक या शब्दामागचा इतिहास माहिती आहे का?

3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्यावर हॅटट्रिकच का होते? या शब्दामागचं नेमकं लॉजिक काय?
SportImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 14, 2026 | 5:38 PM
Share

क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणे खूप कठीण मानले जाते. कारण सलग तीन चेंडूंवर तीन विकेट घेण्यासाठी गोलंदाजाकडे केवळ कौशल्यच नाही तर दबावाच्या वेळी शांत राहण्याची क्षमता देखील असावी लागते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही प्रकारांमध्ये आतापर्यंत शेकडो हॅट्रिक झाल्या आहेत आणि प्रत्येक हॅट्रिक ही चाहत्यांसाठी खास आठवण बनते. पण क्रिकेटमध्ये सलग तीन चेंडूंवर तीन विकेट घेतल्याला ‘हॅट्रिक’ का म्हणतात? हा प्रश्न अनेक क्रिकेटप्रेमींना पडतो. ‘हॅट्रिक’ या शब्दाचा क्रिकेटशी नेमका काय संबंध आहे, यामागची गोष्ट खूप रंजक आहे. चला, याचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया.

क्रिकेटमध्ये ‘हॅट्रिक’ शब्द कुठून आला?

हॅट्रिक या शब्दाची सुरुवात 19 व्या शतकात इंग्लंडमध्ये झाली. 1858 साली झालेल्या एका सामन्यात एच.एच.स्टीफेन्सन या गोलंदाजाने उत्कृष्ट कामगिरी करून मोठी प्रसिद्धी मिळवली होती. स्टीफेन्सन उजव्या हाताने राउंडआर्म वेगवान गोलंदाजी करत, उजव्या हाताने फलंदाजी करत आणि कधी-कधी विकेटकीपिंगही करत असत. त्यांनी हाईट पार्क ग्राउंड येथे ऑल इंग्लंड संघाकडून खेळताना हॉलम आणि स्टेवली संघाविरुद्ध सलग तीन चेंडूंवर तीन विकेट्स घेतल्या. त्या काळात ही कामगिरी अत्यंत खास मानली जात होती. त्यामुळे चाहत्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला.

सामना संपल्यानंतर प्रेक्षकांनी मैदानात पैसे जमा केले आणि त्या पैशांतून एक नवी टोपी विकत घेतली. ही टोपी स्टीफेन्सन यांना सन्मान म्हणून भेट देण्यात आली. म्हणजेच सलग तीन विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला ‘हॅट’ मिळाली आणि या खास कामगिरीला ‘ट्रिक’ असे संबोधले गेले. याच घटनेतून ‘हॅट-ट्रिक’ हा शब्द बोलायला सुरवात झाली. यानंतर 1878-79 मध्ये फ्रेड स्पॉफर्थ यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक घेतली. त्या वेळी वृत्तपत्रांमध्ये पहिल्यांदाच ‘हॅट्रिक’ हा शब्द छापून आला आणि तेव्हापासून हा शब्द क्रिकेटच्या भाषेचा कायमचा भाग बनला.

इतर खेळांमध्येही ‘हॅट्रिक’ हा शब्द वापरला जातो

आज “हॅट्रिक” हा शब्द फक्त क्रिकेटपुरता मर्यादित राहिलेला नाही. हॉकी, फुटबॉल आणि इतर अनेक खेळांमध्येही एखाद्या खेळाडूने सलग तीन गोल किंवा तीन मोठी कामगिरी केली, तर त्याला हॅट्रिक असेच म्हटले जाते. मात्र या शब्दाची मूळ परंपरा क्रिकेटमधूनच सुरू झाली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखादा गोलंदाज हॅट्रिक करताना दिसेल, तेव्हा लक्षात ठेवा की त्या फक्त सलग तीन विकेट्स नाहीत, तर 1858 मध्ये सुरू झालेल्या त्या जुन्या परंपरेचा उत्सव आहे. जिथे एका उत्कृष्ट कामगिरीच्या बदल्यात गोलंदाजाला टोपी भेट देऊन सन्मानित करण्यात आले होते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल