AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वरा करा! फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याज देणाऱ्या SBI च्या योजनेत गुंतवणुकीची शेवटची संधी

SBI Platinum | एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीममध्ये ग्राहकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत बँकेचे ग्राहक मुदत ठेवींवर 15 बेसिस पॉइंट (बीपीएस) अधिक व्याज मिळवू शकता.

त्वरा करा! फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याज देणाऱ्या SBI च्या योजनेत गुंतवणुकीची शेवटची संधी
एसबीआय
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 14, 2021 | 9:51 AM
Share

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त गेल्या महिन्यात मर्यादित कालावधीची विशेष ठेव योजना सुरू केली. या विशेष ठेव योजनेचे नाव एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झालेली ही योजना आज म्हणजेच 14 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. याचा अर्थ असा की जर तुम्हाला त्यात गुंतवणूक करायची असेल तर आज शेवटचा दिवस आहे.

एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीममध्ये ग्राहकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत बँकेचे ग्राहक मुदत ठेवींवर 15 बेसिस पॉइंट (बीपीएस) अधिक व्याज मिळवू शकता. अशा परिस्थितीत जर तुम्हाला एफडी मिळवायची असेल किंवा कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना- 75 दिवस

सध्याचा दर- 3.90 टक्के प्रस्तावित दर- 3.95 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना- 525 दिवस

सध्याचा दर- 5 टक्के प्रस्तावित दर- 5.10 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना- 2250 दिवस

सध्याचा दर- 5.40 टक्के प्रस्तावित दर- 5.55 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना (ज्येष्ठ नागरिक) 75 दिवस

सध्याचा दर- 4.40 टक्के प्रस्तावित दर- 4.45 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना (ज्येष्ठ नागरिक) 525दिवस

सध्याचा दर- 5.50 टक्के प्रस्तावित दर- 5.60 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना (ज्येष्ठ नागरिक) 2250 दिवस

या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर 6.20 टक्के इतका व्याजदर दिला जात आहे.

डेबिट कार्डवरून जास्त पैसे खर्च केले, मग रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करा

नेकदा शॉपिंगला गेल्यावर वस्तू खरेदी करण्याच्या नादात आपल्याला नेमक्या खर्चाचा अंदाज येत नाही. पण बिलिंग काऊंटरवर गेल्यानंतर आपण प्रमाणापेक्षा जास्त खर्च केला असे लक्षात येते. तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर पैसे तात्काळ भरावे लागतात. परंतु, त्यामुळे पुढील खर्चाचा ताळमेळ बिघडण्याची भीती असते.

अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या डेबिट कार्डधारकांना खास सोय देऊ केली आहे. त्यानुसार ग्राहक डेबिट कार्डवरून पूर्ण पैसे खर्च न करता ती रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करु शकता. ग्राहकपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा स्थानिक दुकानांमध्ये तुम्ही डेबिट कार्ड स्वाईप केल्यानंतर तुम्ही ईएमआय सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, Amazon किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स पोर्टलवरून खरेदी करतानाही तुम्हाला या विशेष सुविधेचा लाभ घेता येईल.

योजनेचा फायदा काय?

स्टेट बँकेच्या डेबिट कार्डवर केलेल्या खर्चाची रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट केल्यास तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही. तसेच यासाठी कोणतीही कागदपत्रे जमा करावी लागणार नाहीत. शॉपिंगची रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर तुमच्या बचत खात्यामधील लिमीट पूर्ववत होईल.

इतर बातम्या:

महागडा मोबाईल, त्याचा विमा, नंतर क्लेम, पोलिसात तक्रारीचा कट आणि महिला अडचणीत

भारतात कोणती कंपनी मोबाईल इंटरनेटमध्ये अव्वल? ट्रायची नवी आकडेवारी जाहीर

वोडाफोन-आयडियाचा नवा प्लान लाँच, 100 जीबीचा हायस्पीड डेटा मिळणार

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!