वोडाफोन-आयडियाचा नवा प्लान लाँच, 100 जीबीचा हायस्पीड डेटा मिळणार

देशातील मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि आयडिया या दोन्ही एकत्र येऊन त्यांनी Vi नावाची दुसरी कंपनी स्थापन केली (Vi launch new work from home plan).

वोडाफोन-आयडियाचा नवा प्लान लाँच, 100 जीबीचा हायस्पीड डेटा मिळणार

मुंबई : देशातील मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि आयडिया या दोन्ही एकत्र येऊन त्यांनी Vi नावाची दुसरी कंपनी स्थापन केली (Vi launch new work from home plan). या कंपनीकडून आता अनेक वर्क फ्रॉम होमचे प्लान लाँच केले जात आहेत आणि आता Vi कडून आणखी एक 100 जीबी हाय-स्पीड डेटाचा प्लान ग्राहकांसाठी ऑफर केला आहे (Vi launch new work from home plan).

प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये कंपनीने नवीन प्लान अॅड केला आणि आपल्या अधिकृत वेबसाईटवरही हा प्लान लिस्ट केला आहे. या प्लानचा मोठा फायदा वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना होणार आहे.

Vi ने आता दोन वर्क फ्रॉम होमचे प्लान ग्राहकांना दिले आहेत. My Vi वर शेअर केलेल्या प्लान लिस्टिंगनुसार, 351 रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लान आणि 56 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जात आहे. यामध्ये युझर्सला एकूण 100 जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर केला जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या 251 रुपयांच्या वर्क फ्रॉम होम या प्लानपेक्षा नवीन प्लानमध्ये ग्राहकांना दुप्पट फायदा मिळत आहे.

नवीन 351 रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लानमध्ये अनेक आकर्षक बेनिफिट्स ग्राहकांना ऑफर केले आहेत. या प्लानसाठी ग्राहकांना फक्त 100 रुपये अधिक द्यावे लागणार आहे. ज्या युझर्सला अधिक डेटाची गरज लागते किंवा जे घरातून काम करतात. त्यांच्यासाठी 351 रुपयांचा प्लान चांगला आहे. सध्या हा प्रीपेड प्लान आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात, केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये ऑफर केला जात आहे.

Vi आता आपल्या नवीन ओळखीसह अनेक प्लानमध्येही बदल करत आहे. त्याशिवाय थर्ड पार्टी रिचार्ज पोर्टल्सवरही लवकरच नवीन प्लान लिस्ट होणार आहेत. यापूर्वीही वोडाफोन-आयडिया दोन्ही युझर्सला एकसारखे प्लान मिळत होते.

संबंधित बातम्या :

जिओ फायबर युझर्सला अनलिमिटेड इंटरनेट मिळणार, 5 सप्टेंबरपासून कंपनीकडून फ्री ट्रायल

एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल, व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI