New Labour Codes Update : आठवड्यात 3 दिवस सुट्टी, चारच दिवस काम, अंमलबजावणी लांबणीवर ?

देशातील सर्व राज्यात लेबर कोड एकत्र लागू व्हावा अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. मात्र लेबर कोडची अंमलबजावणी लांबणीवर पडू शकते. केंद्रीय श्रम राज्यमंत्रीनं यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

New Labour Codes Update : आठवड्यात 3 दिवस सुट्टी, चारच दिवस काम, अंमलबजावणी लांबणीवर ?
आठवड्यात 3 दिवस सुट्टीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 1:06 PM

मुंबई : सरकार 1 जुलैपासून संपूर्ण देशात नवा लेबर कोड (New Labour Code) लागू करणार होती. मात्र काही राज्यांमुळे हा मुद्दा अजून निकालात निघालेला नाही. लेबर कोड नक्की कधीपासून लागू होणार, या चर्चेला सध्या तरी विराम लागलेला आहे. चार दिवसांचा आठवडा आणि तीन दिवस सुट्टी, यासारखे नोकरदारांसाठी मोठा बदल आणणारा ऱ्या या नव्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अद्याप तरी मुहूर्त निश्चित झालेला नाही. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) काल (सोमवार) पासून सुरु झाले असून त्यादरम्यान हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी केंद्रीय श्रम राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना, नवा लेबर कोडच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित ठरली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या चर्चेला सध्या तरी ब्रेक लागला असून हा कायदा नक्की कधी लागू होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

बहुतांश राज्यांनी कामगार संहितेवरील ( लेबर कोड) मसुदा केंद्र सरकारकडे पाठवला आहे. 1 जुलै 2022 पासून देशभरात नवा लेबर कोड लागू होणार होता. पण काही राज्यामुळे हा मुद्दा अजून निकालात निघालेला नाही. सध्या 23 राज्यांनी लेबर कोडच्या नव्या तरतुदी स्वीकारल्या आहेत, तरी इतर राज्यांनी ते अद्याप स्वीकारलेले नाही. सर्व राज्यांमध्ये हा लेबर कोड एकत्र लागू व्हावा अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.

काय आहे नवा कायदा ?

नव्या लेबर कोडनुसार, आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी अशा तरतुदीचा प्रस्ताव आहे. मात्र त्यामुळे कर्मचा-यांचे कामाचे तास वाढतील. म्हणजे कर्मचा-यांना 8 किंवा 9 नव्हे तब्बल 12 तास काम करावे लागू शकते. या हिशोबानुसार कर्मचा-यांना चार दिवसात 48 तास काम करावे लागेल. मात्र त्यानंतर आठवड्यात 3 दिवस सुट्टी मिळेल.

हे सुद्धा वाचा

तसेच नवा कोड लागू करण्यात आल्यावर कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटमध्ये कमी पगार येणार आहे. सरकारने पे रोलबाबत नवे नियम तयार केले आहेत. कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार त्यांच्या एकूण पगाराच्या (सीटीसी) 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असावा, अशी तरतूद नव्या कोडमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे पीएफमध्येही आधीपेक्षा अधिक रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यावर चांगली घसघशीत रक्कम मिळणार आहे.

लेबर कोडमध्ये सुट्टी घेण्याबाबतही नवीन बदल करण्यात आला आहे. कोणत्याही संस्थेत काम करताना, दीर्घ सुट्टी हवी असेल तर कर्मचाऱ्यांना 240 दिवस काम करणे बंधनकारक आहे. पण नव्या लेबर कोडमध्ये बदल करण्यात आल्याने आता कर्मचाऱ्यांना 180 दिवस म्हणजे सहा महिने काम करावे लागेल.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.