AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price : कच्चा तेलाचे भाव कडाडले, तुमच्या शहारातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

Petrol-Diesel Price : कच्चा तेलाचे भाव कडाडले, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली का?

Petrol-Diesel Price : कच्चा तेलाचे भाव कडाडले, तुमच्या शहारातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
आजचे भाव काय
| Updated on: Jan 24, 2023 | 8:41 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) जाहीर करतात. सकाळी 6 वाजता या किंमती अपडेट करण्यात येतात. आंतराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या (Crude Oil) किंमती आधारे हे भाव निश्चित करण्यात येतात. आज 24 जानेवारी 2023 रोजी, मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत (Brent Crude) आज 0.64 टक्के वाढ झाली आहे. सध्या हा भाव 88.19 डॉलर प्रति बॅरल आहे. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलचा भाव (WTI Crude Oil Price) 0.01 टक्के वाढ झाली. आजचा भाव 81.63 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला.

कच्चा तेलाच्या किंमती (Crude Oil Price) कडाडल्याने आज देशातील प्रमुख शहरात भाव वाढले का? तर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर आहेत. या किंमतीत कोणताच बदल झाला नाही. शहरानुसार, देशभरात किंमतीत तफावत दिसून येते.

देशात पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठा बदल 21 मे 2022 रोजी झाला होता. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरची कपात झाली. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या भावात फार मोठा बदल झाला नाही. त्यानंतर काही राज्यांनी व्हॅट दरात कपात केली. त्याचा ही परिणाम दिसून आला.

आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेलचा भाव 94.27 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

अहमदनगर पेट्रोल 105.96 रुपये तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर, अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर, अमरावतीत 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर, औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 106.03 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर, नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर आहे.

जळगावमध्ये पेट्रोल 107.49 आणि डिझेल 93.98 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर, लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.10 आणि डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा भाव 105.98 आणि डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर प्रति लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

Follow Us
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका