AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1, 10 की 28…; कोणत्या तारखेला SIP केल्यास जास्त परतावा मिळतो? 30 वर्षांच्या डेटाचा मोठा खुलासा

SIP साठी कोणती तारीख सर्वोत्तम? ३० वर्षांच्या डेटा विश्लेषणातून समोर आला मोठा खुलासा. जाणून घ्या महिन्याच्या कोणत्या तारखेला मिळतो सर्वाधिक परतावा.

1, 10 की 28...; कोणत्या तारखेला SIP केल्यास जास्त परतावा मिळतो? 30 वर्षांच्या डेटाचा मोठा खुलासा
SIP
| Updated on: May 28, 2026 | 1:52 PM
Share

शेअर बाजारात जेव्हा जेव्हा चढ-उतार होतात, तेव्हा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या मनात एक संभ्रम नेहमी निर्माण होतो की मी माझी एसआयपी (SIP) थांबवू का? बाजार आणखी घसरण्याची वाट पाहू की एसआयपीची तारीख बदलून घेऊ, जेणेकरून जास्त नफा मिळेल? अनेकांचा असा समज असतो की, महिन्याची एक ठराविक तारीख निवडल्यास किंवा मंदीच्या काळात हुशारीने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात बंपर परतावा मिळतो. परंतु, बीएसई सेन्सेक्सच्या (BSE Sensex) तब्बल ३० वर्षांच्या टीआरआय (TRI) डेटाच्या विश्लेषणाने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. बाजाराच्या टायमिंगचा परताव्यावर फारसा फरक पडत नसल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

परताव्यात केवळ ०.४८ टक्क्यांचा फरक

व्हाइटओक कॅपिटल म्युच्युअल फंडाने ऑगस्ट १९९६ ते एप्रिल २०२६ या ३० वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना केलेल्या एसआयपी गुंतवणुकीचा सखोल अभ्यास केला. याचे निष्कर्ष नुकतेच समोर आले आहेत. यानुसार जेव्हा बाजार सर्वात फायदेशीर स्थितीत होता, तेव्हा गुंतवणूकदारांना १३.८० टक्के परतावा मिळाला. तर मार्केट डाऊन असताना गुंतवणूक करणाऱ्यांना १३.३२ टक्के परतावा मिळाला. बाजाराचा कोणताही विचार न करता दरमहा एका निश्चित तारखेला एसआयपी सुरू ठेवणाऱ्यांना १३.५८ टक्के परतावा मिळाला. यानुसार सर्वोत्तम आणि सर्वात वाईट दिवसाच्या परताव्यामध्ये केवळ ०.४८ टक्के इतका किरकोळ फरक पाहायला मिळत आहे.

तारीख कोणतीही असो… परतावा सारखाच!

अनेक गुंतवणूकदार महिन्याच्या सुरुवातीला, मध्यभागी की शेवटी गुंतवणूक करावी? असा प्रश्न उपस्थित करतात. या प्रश्नाचे उत्तरही या अहवालात मिळाले आहे. महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना मिळालेला परतावा पाहिला तर त्यात कोणताही लक्षणीय फरक आढळत नाही.

  • प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला केलेल्या एसआयपीने १३.५९% परतावा दिला.
  • महिन्याच्या १० तारखेला केलेल्या गुंतवणुकीवर १३.५५% परतावा मिळाला.
  • महिन्याच्या २० तारखेच्या एसआयपीवर १३.५८% परतावा मिळाला.
  • तर महिन्याच्या २८ तारखेला केलेल्या गुंतवणुकीवर १३.६१% परतावा मिळाला.

तुम्ही महिनाभरात कोणतीही तारीख निवडली, तरी दीर्घकालीन परतावा हा १३.५५% ते १३.६१% च्या दरम्यानच राहतो. या ३० वर्षांच्या ऐतिहासिक आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, एसआयपीमधील यशाची गुरुकिल्ली योग्य तारीख निवडण्यात नसून त्यात सातत्य राखण्यात आहे. बाजारातील चढ-उतारांना न घाबरता जी व्यक्ती नियमितपणे गुंतवणूक करत राहते, तिलाही बाजाराचा अचूक अंदाज लावणाऱ्या गुंतवणूकदारांइतकाच दमदार परतावा मिळतो.

(डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन आहे. वरील माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने असून हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट