AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरासोबत 2 लाख रुपयांचा मिळेल फायदा, जाणून घ्या कोणता फॉर्म भरावा लागेल ते

आपल्याकडे स्वतःची मालमत्ता असल्यास आणि त्यावर गृह कर्ज घेतल्यास आपण त्या व्याजदारावर कपातीचा दावा करू शकता. (You will get a benefit of Rs 2 lakh with the house, know which form you have to fill)

घरासोबत 2 लाख रुपयांचा मिळेल फायदा, जाणून घ्या कोणता फॉर्म भरावा लागेल ते
घर खरेदी हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा भाग असला तरी त्यानंतर फेडावे लागणारे गृहकर्जाचे हप्ते ही बहुतांश लोकांसाठी एकप्रकारची टांगती तलवार असते. तुम्ही गृहकर्जावर पाच लाख रुपयांपर्यंत करमाफी मिळवू शकता. मात्र, गृहकर्जाचे हप्ते वेळेवर फेडले नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 03, 2021 | 3:25 PM
Share

नवी दिल्ली : जर आपण घर खरेदी केले असेल आणि गृह कर्ज घेतले असेल तर त्याच्या व्याजावर आपण डिडक्शन क्लेम करु शकता. याला डबल बोनांन्झा म्हणता येईल. घर खरेदी केल्यावर तुम्हाला दोन लाखांचा नफा मिळतो. घर खरेदीवर आपणास दोन लाख रुपयांपर्यंतची कर सूट सहज मिळू शकेल. याला कर बचत गृह कर्ज परतफेड असे म्हणतात. गृह कर्ज संयुक्तपणे घेतले तर दोन्ही व्यक्ती गृह कर्जाच्या कर्जावर जास्तीत जास्त कपात करू शकतात. (You will get a benefit of Rs 2 lakh with the house, know which form you have to fill)

घर खरेदीसाठी गृह कर्ज ईएमआयवर कर सूट मिळण्याचा लाभ उपलब्ध आहे. ईएमआयमधील मूळ रकमेच्या (मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कासह) 80 सी अंतर्गत कर सवलत मिळवू शकता. आपल्याकडे स्वतःची मालमत्ता असल्यास आणि त्यावर गृह कर्ज घेतल्यास आपण त्या व्याजदारावर कपातीचा दावा करू शकता. अशा परिस्थितीत आपण आयकर कलम 24 (बी) अंतर्गत जास्तीत जास्त 2 लाख रुपयांचा दावा करु शकता. जर आपण ती मालमत्ता भाड्याने दिली असेल तर आपण गृह कर्जावरील व्याजावर कपातीचा दावा देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्राप्तिकर 24 (बी) फॉर्म भरावा लागेल.

टॅक्स क्लेमचे कोण-कोणते फॉर्म

जर एखाद्या व्यक्तीने प्रथमच घर विकत घेतले असेल तर त्याला 80EE अंतर्गत जास्तीत जास्त 50,000 रुपये कपात करण्याची सुविधा मिळेल. त्याचप्रमाणे 80EEA अंतर्गत 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त डिडक्शन क्लेम सुविधा आहे. तथापि हा फॉर्म भरताना लक्षात ठेवा की कलम 80EEA अंतर्गत खरेदी केलेल्या मालमत्तेचे मुद्रांक मूल्य 45 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच हे कर्ज 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत दिले गेले असावे. ज्या तारखेला कर्ज घेतले आहे त्या तारखेला कर्जदाराकडे कोणतीही अन्य घरे किंवा निवासी मालमत्ता असू नये. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे म्हणजे मालमत्तेचे बांधकाम 5 वर्षांच्या आत पूर्ण झाल्यासच कर्ज घेणाऱ्याला 2 लाख कर कपातीचा फायदा मिळेल. जर 5 वर्षांत बांधकाम पूर्ण झाले नाही तर आपण केवळ 30 हजार रुपयांवर दावा करू शकता.

80 सी अंतर्गत लाभ

– आपण राहत असलेले घर किंवा भाड्याने दिलेले घर दोन्ही मालमत्तेवर आपण वार्षिक 1.5 लाख दावा करू शकता. – या नियमांतर्गत आपल्याला मालमत्तेचे बांधकाम 5 वर्षात पूर्ण करावे लागेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर डिडक्शनचा दावा करु शकतो. – 5 वर्षांच्या आत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, मालमत्ता त्याच कालावधीत विकलेली नसावी. – जर मालमत्ता 5 वर्षांच्या आत विकली गेली तर डिडक्शन रिवर्स होईल. ज्या वर्षी मालमत्ता विकली जाईल त्या वर्षात डिडक्शन रिवर्स होईल आणि त्या वर्षाच्या तुमच्या उत्पन्नामध्ये कपातची रक्कम जोडली जाईल. – आपण सह-मालक किंवा सहकारी असल्यास, आपण मूळ कपात म्हणून 1.5 लाख रुपयांचा दावा करु शकता – या कलमांतर्गत डिडक्शनच्या दाव्यामध्ये मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी देखील जोडली जाऊ शकते.

80EE अंतर्गत फायदे उपलब्ध

– जर आपण प्रथमच घर विकत घेतले असेल तर आपण कलम 24 आणि 80 सी अंतर्गत सूट मागू शकता. – यासाठी आपण 1 एप्रिल, 2016 ते 31 मार्च 2017 दरम्यान कर्ज घेतले पाहिजे. – तुमची मालमत्ता मूल्य 50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. – गृह कर्ज कोणत्याही परिस्थितीत 35 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. – इतर निवासी घराची मालमत्ता ज्या दिवशी कर्ज मंजूर आहे त्या तारखेनुसार आपल्या नावे असू नये. – आपण कर्ज परतफेड करेपर्यंत आपण दरवर्षी या कलमांतर्गत 50,000 रुपयांच्या कपातीचा दावा करू शकता. (You will get a benefit of Rs 2 lakh with the house, know which form you have to fill)

इतर बातम्या

रासायनिक खतांचा वापर न करता कांदा पिकवला, बाजारपेठेत मिळाला विक्रमी भाव

माथाडी कामगारांसाठी काम करणाऱ्या पाटील दाम्पत्याकडून स्वखर्चाने लसीकरण, शशिकांत शिंदेच्या हस्ते उद्घाटन

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...