AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रासायनिक खतांचा वापर न करता कांदा पिकवला, बाजारपेठेत मिळाला विक्रमी भाव

Onion price | निफाड तालुक्यातील सुकेने येथील कांदा उत्पादक शेतकरी शामराव सीताराम मोगल यांनी आपल्या शेतात कुठल्याच केमिकल औषधांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करून उन्हाळ कांदा पिकवला होता.

रासायनिक खतांचा वापर न करता कांदा पिकवला, बाजारपेठेत मिळाला विक्रमी भाव
उन्हाळी कांदा
| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 2:52 PM
Share

नाशिक: एकीकडे मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा देशांतर्गत होण्यास सुरुवात झाल्याने कांद्याच्या दरात घसरण होत आहे तर आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत पाकिस्तानचा कांदा (Onion) स्वस्त दरात उपलब्ध होत असताना दुसरीकडे पिंपळगाव बसवंत बाजार समिती सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या उन्हाळ कांद्याला 4200 रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. (Onion farmer get record break price for crop in Nashik)

निफाड तालुक्यातील सुकेने येथील कांदा उत्पादक शेतकरी शामराव सीताराम मोगल यांनी आपल्या शेतात कुठल्याच केमिकल औषधांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करून उन्हाळ कांदा पिकवला होता. विषमुक्त कांदा असल्याने थेट बैलगाडीची सजावट करून समवेत संबळ वाजंत्री पथक घेऊन कांदा पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी दाखल झाला. यावेळी इतर शेतकऱ्यांनी संबळच्या तालावर ठेक धरला होता त्यानंतर बाजार समितीच्या कार्यालयाजवळ लिलाव प्रक्रिया पार पडली शामराव मोगल यांच्या सेंद्रिय कांद्याचा 4200 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे चालू वर्षातील उच्चांकी दराने विक्री झाली.

नवी मुंबई बाजारपेठेत कांद्याचा भाव घसरला

एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात पाच रुपयांची घसरण झाली. पाकिस्तान कांदा दुबईला आयात झाला असून तो कांदा स्वस्त असल्याने बाजारभावात घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बांगलादेश सीमा बंद करण्यात आल्याने आपल्याकडून बांग्लादेशात जाणार कांदा (Onion) कमी झाला आहे. तर पाकिस्तानचा कांदा स्वस्त असल्याने त्या कांद्याला दुबईत मागणी वाढली असल्याने दुबईला होणारी कांदा निर्यात कमी झाली. त्यामुळे परिणामी कांद्याच्या व्यापारावर परिणाम झाला असून मालाला अधिक उठाव नसल्याने कमी दरात विक्री करावी लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

कांदा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विका

भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी चांगल्या प्रतवारीचा आणि कमी दरामध्ये पाकिस्तानचा कांदा उपलब्ध झाला आहे. श्रीलंकेत भारतीय कांदा 450 डॉलरमध्ये प्रति टन तर पाकिस्तानचा कांदा 310 डॉलर प्रति टनामध्ये मिळत आहे. मात्र देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याने बाजारभाव टिकून राहण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा. पाकिस्तानच्या कांद्यामुळे भारतीय कांद्याच्या बाजारभावात सध्यातरी कोणताही परिणाम होणार नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये असे या क्षेत्रातील तज्ञ सांगत आहेत.

संबंधित बातम्या: 

कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, लासलगांव बाजारसमितीत 1315 कोटींची उलाढाल

पाकिस्तानचा स्वस्त कांदा बाजारपेठेत, बांगलादेशच्या सीमा बंद, भारतीय कांदा उत्पादक अडचणीत

भारताच्या बासमती तांदळाचा जगभर डंका, 125 देशांमध्ये 30 हजार कोटींची निर्यात

(Onion farmer get record break price for crop in Nashik)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.