100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 28 September 2021

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याचवेळी किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा तिसरा आरोप करण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्यांनी यापूर्वीही कोल्हापूर दौरा घोषित केला होता, त्यावेळी त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. पण आता सोमय्यांवरील ही जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. किरीट सोमय्या हे सकाळी 8 च्या सुमारास कराडहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. त्याआधी कराडमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचे शेतकरी, संचालकांनी सोमय्यांची भेट घेतली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI