मुख्यमंत्री शिंदेंनी साधला जखमींशी संवाद, या बातमीसह इतर बातम्या पहा 36 जिल्हे 72 बातम्या मध्ये
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी 5 लाखांची मदत ही तुटपुंजी असल्याचे म्हटलं आहे. तर मृतांच्या कुटुंबियांना भरीव मदत करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
नाशिकमध्ये झालेल्या बस दुर्घटनास्थळी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. तसेच बस दुर्घटना कशी झाली याची देखील माहिती शिंदे यांनी घेतली. त्याचवेळी शिंदे यांनी शिंदे यांनी नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात जात जखमींशी संवाद साधला. तसेच त्यांनी जखमींशी विचारपूस देखिल केली. तर शिंदे यांनी अपघातात मृत्यू पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली. ही मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी 5 लाखांची मदत ही तुटपुंजी असल्याचे म्हटलं आहे. तर मृतांच्या कुटुंबियांना भरीव मदत करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तर अमरावती मनपाला कर कमी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यानंतर काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आला. तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या रूंदीकरणासाठी 67 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नागपूर-गोवा माहामार्गासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 760 किलोमीटर लांबीचा हा माहामार्ग असणार आहे. तर लवकरात लवकर सल्लागारांची नियुक्ती याकामी करण्यात येणार आहे. तर अमरावतीत परतीच्या पावसाने संत्रासह सोयाबीनच्या पीकाचं मोठं नुकसान झालं आहे.
Published on: Oct 08, 2022 06:40 PM
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
