4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 17 September 2021

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनामराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फटकेबाजी केली. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर दिल्याचं पाहायला मिळालं.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. हा सोहळा पार पडल्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, MIM खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फटकेबाजी केली. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर दिल्याचं पाहायला मिळालं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI