दानवे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, उद्धव म्हणाले, शब्द दिला!

"मराठवाड्यात आपण आपआपसात भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करुन आपणही भांडत राहिलो तर फरक काय राहिला. अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या" असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

दानवे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, उद्धव म्हणाले, शब्द दिला!
रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


औरंगाबाद : “रावसाहेब दानवेंना शब्द देतो, तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घ्या, आम्ही खंबीर पाठीशी राहतो” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलं. मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले होते. “मराठवाड्यात आपण आपआपसात भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करुन आपणही भांडत राहिलो तर फरक काय राहिला. अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा दानवेंना शब्द

माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल, तर मी तुमच्या सोबत आहे. रावसाहेब तुम्ही प्रेझेंटेशन दिलं नाही तरी चालेल, आम्ही पाठीशी उभे राहू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. रावसाहेब बऱ्याच दिवसांनी एकत्र आलेत, जुने सहकारी आहेत, गंमत-जंमत हवीच, असं म्हणत आज सुद्धा पैसे द्यायला तुमच्यावर विश्वास ठेवतात की नाही माहीत नाही असा रावसाहेब दानवे यांना टोला लगावला.

88 साली सभा औरंगाबादेत झाली तेव्हा मी सभेच्या मागे गच्चीवर पाहत होतो, पण तेव्हा मला माहित नव्हते की मी पण मुख्यमंत्री होऊन कार्यक्रमाला येईन, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“जे करायचं ते सरळ करीन”

मला रेल्वे का आवडते कारण तिला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. 45 वर्षात दुसऱ्यांदा उद्घाटन झालं, पण आता तसं होणार नाही, अब्दुल जी आणखी 20 कोटी मिळतील पण मला त्याचा हिशोब हवाय, जे करायचं ते सरळ करीन, मला इकडे ही इमारत उभे राहिलेले पाहिजे म्हणजे पाहिजेच, दया माया चालणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी खडसावून सांगितलं.

“जिल्हा परिषद हे जनतेची सेवा करणारं मंदिर”

जे काही गरजेचं आहे ते केल्याशिवाय मी राहणार नाही. क्लायमेट चेंज झालंय हे दुर्भाग्य आहे आपलं. अतिवृष्टी सुद्धा अशी होतेय की काही दिवसांचा पाऊस काही तासात पडतोय. जिल्हा परिषद हे जनतेची सेवा करणारं मंदिर आहे. याचं पावित्र्य जपलं पाहिजे. मराठवाड्यात संतपीठ पाहिजेच, मराठवाडा संतांची भूमी आहे. जनता बघायला पाहिजे असं कार्यालय झालं पाहिजे, मी मुंबईत एक वार्ड ऑफिसचं उद्घाटन केलं. ते मला आवडलं कारण तिथे व्यायाम करण्यासाठी जिम बनवली आहे. इथे सुद्धा तशा गोष्टी झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

“जनता रावचा रंक रंकाचा राव करू शकते”

कारभाराचा दर्जा सुद्धा उत्तम असला पाहिजे ही माझी अट आहे. आणि हे जर मान्य असेल तर मी पैसा कमी पडू देणार नाही. पण मला तारखा द्याव्या लागतील तारखेवर कामे पूर्ण झाली तर पैसे मिळतील. जनतेत खूप ताकत आहे, रावचा रंक रंकाचा राव करू शकते, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.

हे ही वाचा :

LIVE UPDATE | मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा, निजामकालीन शाळांचा पुनर्विकास करणार

74 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळ्यासाठी औरंगाबाद सज्ज, पोलिसांचे संचलन

हा आमचा विकास नव्हे, आमचा विकास अजून दिसायचा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यासाठी 8 मोठ्या घोषणा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI