LIVE : संत विद्यापीठ ते शिर्डी-औरंगाबाद हवाई प्रवास, मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केलं. यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा केल्या.

LIVE : संत विद्यापीठ ते शिर्डी-औरंगाबाद हवाई प्रवास, मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 9:42 AM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केलं. यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा तसंच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

निजामाच्या आपल्याला कोणत्याच खुणा ठेवायच्या नाहीत, असं सांगताना येणाऱ्या काळात विकास काय असतो, हे शिवसेना दाखवून देईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या एमआयएमला त्यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर केलं. आज ज्याने ज्याने मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले त्यांना मला सांगायच आहे की आमचा विकास आता सुरु झाला आहे आणि अजून खूप विकास होणार आहे, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या?

– मराठवाड्यासाठी संतपीठ व्हावं – निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार – औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन – औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना – मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरउर्जा प्रकल्प उभारणार – घृष्णेश्वर सभामंडप उभारणार – औरंगाबादला पर्यटन समृद्ध – परभणीत शासकीय महाविद्यालय

उद्धव ठाकरे सकाळी 7.30 वाजता मुंबईहून विमानाने औरंगाबादकडे रवाना झाले. सकाळी 8.25 वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळ आगमन झालं.  सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांनी सिद्धार्थ उद्यान येथे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सकाळी 10.40 वाजता शेंद्रा येथील ऑरिक सिटी आणि डीएमआयसी अंतर्गतच्या विविध कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता ते चिकलठाणा विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचं उपहासात्मक स्वागत करण्यासाठी एमआयएमचे कार्यकर्ते रस्त्यावर

बाबा चौक परिसरात शेकडो एमआयएम कार्यकर्ते एकत्र आले आहेत. हातात स्वागताचे फलक घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर जमा झाले आहेत. बाबा चौकात स्वागतासाठी चारही बाजूने कार्यकर्ते उभे आहेत. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

एमआयएमच्या दोन नगरसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

औरंगाबाद विमानतळाबाहेरून एमआयएमच्या आंदोलनकर्त्या दोन नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  उद्धव ठाकरे यांच्या एमआयएमकडून होणाऱ्या उपहासात्मक पद्धतीच्या स्वागतास पोलिसांनी मनाई केली आहे.

शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरातील विमानतळ, बाबा पेट्रोलपंप, सिद्धार्थ उद्यान, जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आदी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. या दिवशी विविध राजकीय पक्षही आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलीस दलानेही काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेशी खबरदारी घेतलेली आहे.

दो गज की दूरी…मास्क है जरूरी

EP मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन करतील. सकाळी 9.25 वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कार्यक्रम स्थळी 400 च्या जवळपास खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या किंवा आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच या कार्यक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे. वीस हजार चौरस फुटाच्या मंडपाची उभारणी केली असली तरी 200 लोकांनाच कार्यक्रमात उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे.

(Cm uddhav thackeray Visit Aurangabad Over Marathwada Mukti Sangram Din live Updates)

हे ही वाचा :

74 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळ्यासाठी औरंगाबाद सज्ज, पोलिसांचे संचलन, उद्या सकाळी 9 वाजता ध्वजारोहण

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.