VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 10 November 2021

नवाब मलिक सकाळी लवंगी देखील लावू शकले नाहीत. लवंगी लावण्याच्या प्रयत्नात त्यांचे हात पोळले. नवाब मलिक यांची हतबलता इतकी होती त्यांना हायड्रोजन सोडा ऑक्सिजन लागेल, असं आशिष शेलार म्हणाले. मुन्ना यादव, हाजी हैदार, हाजी अराफतचा भाऊ यासह नाव सांगून नवाब मलिक यांनी प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला

नवाब मलिक सकाळी लवंगी देखील लावू शकले नाहीत. लवंगी लावण्याच्या प्रयत्नात त्यांचे हात पोळले. नवाब मलिक यांची हतबलता इतकी होती त्यांना हायड्रोजन सोडा ऑक्सिजन लागेल, असं आशिष शेलार म्हणाले. मुन्ना यादव, हाजी हैदार, हाजी अराफतचा भाऊ यासह नाव सांगून नवाब मलिक यांनी प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. याचा संबंध देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडणं म्हणजे अकबर आणि बिरबलाच्या गोष्टीशी आहे, असं आशिष शेलार म्हणाले. सचिन वाझेच्या चौकशीत रियाझ भाटीचं नाव आल्यानं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं लपवला आहे का? असा सवाल आशिष शेलार यानी केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI