VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 28 July 2021

राज्यात पूरपरिस्थिती आहे. लोक हवालदिल झाले आहेत. त्यांना मदतीची अपेक्षा आहे. असं असताना पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार मात्र ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी खोचक टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

राज्यात पूरपरिस्थिती आहे. लोक हवालदिल झाले आहेत. त्यांना मदतीची अपेक्षा आहे. असं असताना पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार मात्र ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी खोचक टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली आहे.  शरद पवार निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळत आहेत. त्यासाठी दौरे केले म्हणून पुतण्याची कान उघडणी करत आहेत. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI