VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 2 PM | 5 July 2021
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तालिका अध्यक्षांनाही धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची बैठक सुरु आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी आमदार उतरले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारनं इम्पेरिकल डाटा द्यावा असा ठराव मांडण्यात आला. त्यावेळी विरोधी आमदारांनी जोरदार गोंधळ घालायला सुरुवात केली.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?

