मला कुत्रं निशाणी दिली निवडून येईन, शिंदे गटातल्या मंत्र्याचं वक्तव्य चर्चेत!
आमदारकी, मंत्रिपद जातं. पण कार्यकर्ता पद जात नाही. काम केलं तशी शक्ती मिळते. मग कितीही गतिरोधकं आले तर सरळ गाड्या मुंबईपर्यंत जातात. आणि एकदा जनतेनं स्वीकारलं नाही तर वखरावरही कुणी ठेवत नाही, असं वक्तव्य सत्तारांनी केलंय.
दत्ता कनवटे, औरंगाबादः शिवसेना (Shivsena) कुणाची, धनुष्यबाण कुणाचा हा वाद आता निवडणूक आयोगाकडे (Election Commission) गेला असताना शिंदे गटाच्या मंत्र्याचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. औरंगाबादचे आमदार आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तारांचं (Abdul Sattar) हे वक्तव्य आहे. औरंगाबादेत आज हिंदु गर्व गर्जना यात्रेदरम्यान मेळावा घेण्यात आला. यावेळी सत्तार म्हणाले, मला कुत्रं निशाणी दिली तरी मी निवडून येईन. हा कमजोर कमकुवत माणसाला सपोर्ट लागतो. आपण कार्यकर्ता आहोत. कार्यकर्ता माणसाला कधीही भीती वाटत नाही. कार्यकर्ता पद कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. आमदारकी, मंत्रिपद जातं. पण कार्यकर्ता पद जात नाही. काम केलं तशी शक्ती मिळते. मग कितीही गतिरोधकं आले तर सरळ गाड्या मुंबईपर्यंत जातात. आणि एकदा जनतेनं स्वीकारलं नाही तर वखरावरही कुणी ठेवत नाही, असं वक्तव्य सत्तारांनी केलंय.
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
