AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका

जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका

| Updated on: Oct 17, 2026 | 12:48 PM
Share

दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जामीन अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाईल. लेहरा दो तिरंगा रॅलीदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या नेहा बोरा यांची १२ तासांनंतर सुटका झाली असून, त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना अटक केली आहे. जामीन देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दिपके यांना आज विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार असून, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांना लेहरा दो तिरंगा रॅलीच्या आधी ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या घटनेदरम्यान, लेहरा दो तिरंगा रॅलीदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या नेहा बोरा यांची १२ तासांनंतर सुटका करण्यात आली.

नेहा बोरा यांना दिल्लीतील आर. के. पुरम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. सुटका झाल्यानंतर नेहा बोरा यांनी सरकारच्या कारवाईवर जोरदार निशाणा साधला. अटकेच्या कारवाईवर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दिपके सध्या कोणत्या पोलीस ठाण्यात आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Published on: Oct 17, 2026 12:45 PM

Follow Us