AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच

Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच

| Updated on: Jul 27, 2026 | 2:41 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणावर सुरू असलेल्या आंदोलनानंतर देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याची चर्चा आहे. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडीनंतर अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाल्याचे सांगितले जात आहे. 20 जुलै 2026 रोजी अभिजीत दिपके यांच्या मार्गदर्शनाखाली संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आंदोलन अधिक चर्चेत आले.

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी कुटुंबीयांना वारंवार फोन न करण्याचे आवाहन केले. “मी आता संपूर्ण देशाचा मुलगा आहे. लोक माझी काळजी घेत आहेत, त्यामुळे सतत चिंता करू नका, मला सतत कॉलदेखील करू नका” असे त्यांनी म्हटले.

यावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांच्या वडिलांनी सांगितले की, मुलाने असा मार्ग निवडेल असे वाटले नव्हते. मात्र, त्याच्या प्रत्येक निर्णयात आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. तसेच, अनोळखी फोन आल्यावर मनात चिंता निर्माण होते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Published on: Jul 27, 2026 02:41 PM

Follow Us