अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. इगतपुरी येथील व्यापारी संघटनेने शहरात बंदची हाक दिली होती, जो पाळण्यात आला. अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही असेच शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले.
अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त होत असून, सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरात व्यापारी संघटनेने बंदची हाक दिली होती, ज्याला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा बंद पाळण्यात आला.
इगतपुरीप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून अजित पवार यांना आदरांजली वाहिली. कालपासून सर्वत्र शोकाचे वातावरण असून, अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्त होत आहे. व्यापारी संघटनांनी बंद पाळून या दुःखात सहभाग घेतला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ

