Amravati | अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयान या मुख्य आरोपीला अटक केली. या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयान या मुख्य आरोपीला अटक केली. या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
परतवाडा परिसरातील काही व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये पोलिसांनी आरोपी अयानची धिंड काढली आहे. या गंभीर प्रकरणातील सखोल तपासासाठी पोलिस तो राहत असलेल्या परिसारात आल्याचे सांगितले जात आहे. पोलीस त्याला मित्राच्या घरी घेऊन गेले आणि काही प्रश्न विचारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आरोपी आयानने आतापर्यंत आठ तरुणींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ पुरावे हाती लागले आहेत. मात्र, प्राथमिक तपासात हा आकडा अधिक मोठा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून १८० पेक्षा अधिक तरुणींचे शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अटकेनंतर त्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे दिसून आले आहे.
या प्रकरणातील पीडित तरुणी परतवाडा, अमरावती आणि नागपूर परिसरातील असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एक आरोपी एमआयएम पक्षाशी संबंधित कार्यकर्ता असल्याची माहितीही पुढे आली आहे.
Published on: Apr 22, 2026 01:40 PM
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi

