हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, थार अन्… अमरावतीतील आरोपीच्या रॉयल लाईफस्टाईलमागे नेमका कुणाचा हात?
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज या मुख्य आरोपीला अटक केली. या प्रकरणातील अयाजच्या व्हायरल व्हिडीओने लोकांच्या नजरा वळवल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज या मुख्य आरोपीला अटक केली. या प्रकरणातील अयाजच्या व्हायरल व्हिडीओने लोकांच्या नजरा वळवल्या आहेत.
अयाजच्या हातात पिस्तूल, पैशांचं बंडल आणि थारची सवारी करत असलेल्या व्हिडीओने खळबळ उडवली आहे. यानंतर आरोपीच्या रॉयल लाईफस्टाईल मागे नेमका कुणाचा हात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर व्हिडीओमध्ये आरोपी अयाज त्याचे राजसी राहणीमान दाखवताना दिसत आहे. महागडी थार, त्यात दोन-तीन आयफोन अन् बरंच काही, ही दृश्ये अगदी थक्क करणारी आहेत.
आरोपी अयाजने आतापर्यंत आठ तरुणींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ पुरावे हाती लागले आहेत. मात्र, प्राथमिक तपासात हा आकडा अधिक मोठा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून १८० पेक्षा अधिक तरुणींचे शोषण केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे दिसून आले आहे.
या प्रकरणातील पीडित तरुणी परतवाडा, अमरावती आणि नागपूर परिसरातील असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एक आरोपी एमआयएम पक्षाशी संबंधित कार्यकर्ता असल्याची माहितीही पुढे आली आहे.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी

