Special Report | मोदींवरील वक्तव्यानंतर नाना पटोले यांचा पंजा छाटण्याची भाषा
कालपासून राज्यात नाना पटोलेंच्या (Nana patole) वक्तव्यावरून जोरदार गदारोळ सुरू आहे. नाना पटोलेंचा तो व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप (Bjp) नेत्यांनी आक्रमक होत टिकेची झोड उडवली आहे. भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil bonde) यांनीही नाना पटोलेंवर टीकेची झोड उडवली आहे.
अमरावती : कालपासून राज्यात नाना पटोलेंच्या (Nana patole) वक्तव्यावरून जोरदार गदारोळ सुरू आहे. नाना पटोलेंचा तो व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप (Bjp) नेत्यांनी आक्रमक होत टिकेची झोड उडवली आहे. भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil bonde) यांनीही नाना पटोलेंवर टीकेची झोड उडवली आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये कुत्र्यांसारखी भुंकायची स्पर्धा लागली आहे. सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत लागली आहे. “नाना पटोले याने तर हद्दच केली मी मालकीणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा आहे. म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचीही धमकी दिली. पण, नानांनी लक्षात ठेवावं शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल.”, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोर निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव, असा इशारा बोंडे यांनी पटोले यांना दिला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

