Anjali Damania Video : ‘तुम्हाला काय ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?’, ‘त्या’ वक्तव्यावरून अंजली दमानियांचा पंकजा मुंडेंना खोचक सवाल
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी १५०० पानांचे दोषारोपत्र दाखल केले असून यासंदर्भात माध्यमांनी सवाल केला अशता भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे भडकल्याचे पाहायला मिळाले यावर दमानियांनी पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केला.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात माध्यमांनी भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडेंना सवाल केला असता त्या भडकल्याचे पाहायला मिळाले. ‘मी पुण्यात आले आहे. तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात. पुण्यातले प्रश्न विचारा. पुण्यात त्या मुलीवर बलात्कार झाला. तो प्रश्न का विचारत नाही? असा सवाल त्यांनी पत्रकारांनाच फटकारलं. दरम्यान, यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाष्य करत पंकजा मुंडे यांनाच खोचक सवाल केला. ‘पंकजा मुंडे यांची एक प्रतिक्रिया ऐकून अतिशय धक्का बसला. त्या म्हणताय, मला तुम्ही पुण्यात घडलेल्या घटनेवर प्रश्न विचारा… मी आता पुण्यात आहे. पुण्यात असताना तुम्ही मला बीडमधील प्रश्न का विचारतात… अहो तुम्ही बीडमधल्या आहात. परळीला राहतात. तुम्हाला बीडमधील प्रश्न विचारणार नाही तर कोणाला विचारायचं?’, असा सवाल अंजली दमानिया यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांना केला. पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘तुम्ही बीडच्या आहात, बीडच्या लोकप्रतिनिधी आहात त्यामुळे तेथील घटनांचे सवाल तुम्हालाच करणार पण त्याचे प्रश्न ऐकून धक्काच बसला…जर तुम्ही फिरायला अमेरिकेत गेला तर तुम्हाला काय ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?’, असा खोचक सवाल करत दमानियांनी मुंडेंवर हल्लाबोल केला.