Pankaja Munde Video : ‘एक मिनिटं… पुण्यात असताना बीडचे प्रश्न कशाला…’, पंकजा मुंडे पत्रकारावरच भडकल्या अन्…
'संतोष देशमुख यांच्या हत्येता मी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्याची वेगळी चौकशी करावी, अशी मी मागणी केली आहे. या प्रकरणातील सखोल माहिती माझ्याकडे नाही', बीडच्या संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारताच पंकजा मुंडेंनी पत्रकाराला फटकारलं.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी १५०० पानांचे दोषारोपत्र दाखल केले असून यासंदर्भात माध्यमांनी सवाल केला अशता भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे भडकल्याचे पाहायला मिळाले. ‘संतोष देशमुख प्रकरणाची मला माहिती नाही. हे सगळे गृह खात्याकडे असते. त्यांना माहिती असेल. संतोष देशमुख यांच्या हत्येता मी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्याची वेगळी चौकशी करावी, अशी मी मागणी केली आहे. या प्रकरणातील सखोल माहिती माझ्याकडे नाही. तसेच या विषयावर बोलण्याची माझी जबाबदारी नाही. माझा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणीस या प्रकरणी लक्ष घालून आहेत. त्यामुळे दोषींवर नक्की कारवाई होईल. हे प्रकरण संवेदनशील आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. जलदगतीने चौकशी झाली पाहिजे, आरोपीला शिक्षा द्यावी हे आधीच बोलले आहे’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पुण्यात आले आहे. तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात. पुण्यातले प्रश्न विचारा. पुण्यात त्या मुलीवर बलात्कार झाला. तो प्रश्न का विचारत नाही? नांदेडमध्ये काल अत्याचाराचा प्रकार घडला. संपूर्ण राज्यात असे प्रकार घडत असल्याचे सांगत असताना त्यांनी पत्रकारांनाच फटकारल्याचे पाहायला मिळाले.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
