Suresh Dhas Video : ‘खरा आका तोच अन्…’, CID च्या आरोपपत्रातून वाल्मिक कराडचं नाव समोर येताच सुरेश धसांकडून पोलखोल
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सीआयडीने तब्बल1800 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. CID ने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची माहिती मिळतेय.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सीआयडीने 1800 पानाचं आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोपपत्रातून वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. वाल्मिक कराडला अवादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी उकळायची होती. पण त्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून वाल्मिक कराडने हत्येच कारस्थान रचलं. हत्येमागच हेच कारण असल्याच सीआयडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. तर या प्रकरणातून सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे या दोघांना आरोपपत्रातून वगळण्यात आलं आहे. दरम्यान, CID ने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच नाव समोर येताच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड, मुख्य सूत्रधार, आका सगळं काही आहे. हाच सगळं काही करत होता. यानीच बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. गुंडप्रवृत्तीच्या लोकांना मदत करणं, पैसा पुरवणं आणि अशा टोळ्या निर्माण करून त्यांना अभय देईन अशी कृत्य करून घ्यायची असा उद्योग वाल्मिक कराडचा चलला होता’, असं म्हणत सुरेश धस यांनी सीआयडीच्या आरोप पत्रातून झालेल्या मोठ्या खुलाशावर भाष्य केले आहे.