Santosh Deshmukh Case : ‘वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा मास्टरमाईंड’, CID च्या आरोपपत्रात स्पष्टच म्हटलंय…
राज्य सरकारने सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी आणि एसआयटीची स्थापना केली होती. आता सीआयडीने 1800 पानाच आरोपपत्र दाखल केलय. त्यानुसार वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याच सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी आणि एसआयटीची स्थापना केली होती. यासंदर्भात सीआयडीने तब्बल1800 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. CID ने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची माहिती मिळतेय. या हत्या प्रकरणात एकूण आठ जणांवर मकोका लावण्यात आला होता. त्यानंतर ही महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांनी कशाप्रकारे कट रचून हत्या केली याचे पुरावे आहेत. सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडीओ सीआयडीकडे आहेत. इतकंच नाहीतर वाल्मिक कराडला अवादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी उकळायची होती. पण त्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून वाल्मिक कराडने हत्येच कारस्थान रचलं. हत्येमागच हेच कारण असल्याच सीआयडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. यासह आरोपी सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झालं, नेमकं काय बोलणं झालं, संतोश देशमुख यांची हत्या कशी झाली? त्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून देण्यात आली आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
