पुणे बलात्काराच्या घटनेसंदर्भातील ‘त्या’ वक्तव्यावर गृहराज्यमंत्री स्पष्टच बोलले, ‘मी पण एका मुलीचा बाप…’
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्याच्या घटनेवरून केलेल्या वक्तव्यांनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. कदमांच वक्तव्य असंवेदनशील असल्याची जोरदार टीका होतेय. त्यानंतर आता कदमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलंय.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्याच्या घटनेवरून केलेल्या वक्तव्यांनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. कदमांच वक्तव्य असंवेदनशील असल्याची जोरदार टीका होतेय. त्यानंतर आता कदमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलंय. पुण्यातील बलात्काराच्या घटनेवरून सरकारच्या दोन मंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केलं. तरूणीने आराडा-ओरडा केला नाही. सगळं शांततेने घडलं, असं असंवेदनशील वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं. तर घटना घडतच असतात आणि कारवाई शासन करत असते असं मंत्री संजय सावकारे म्हणाले. त्यामुळे विरोधकांनी जोरदार समाचार घेतला. मात्र मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. वक्तव्याचा विपर्यास केल्याचं योगेश कदम म्हणाले. कदम यांच्यानंतर मंत्री सावकारे यांनी घटना घडतच असतात असं म्हटल्यानंतर राऊत यांनी आर आर पाटील यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. अशाच वक्तव्यानंतर आर आर पाटील यांनी राजीनामा दिला होता असं संजय राऊत यांनी म्हटलं. दरम्यान, योगेश कदम आणि सावकारे यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलपणे बोलण्याचा सल्ला दिलाय. तसेच योगेश कदम नवीन असल्याचं फडणवीस म्हणाले. पुण्यात तेही बस डेपोत बस मध्ये बलात्काराची घटना घडल्यानंतर सर्वत्र रोष निर्माण झालाय. त्यातच मंत्री बेजबाबदार वक्तव्य करत असतील तर त्यातून असंवेदनशीलताच दिसून येते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलतेवर बोटं ठेवत वेळीच कान टोचले.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
