Ashok Kharat | ज्याची भीती तेच… लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं… आता प्रकृती कशी?
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी सुरू असताना अशोक खरात याची प्रकृती अचानक बिघडल्याने पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. चौकशीदरम्यान त्याना मळमळ, उलट्या, तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स बोलावून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी सुरू असताना अशोक खरात याची प्रकृती अचानक बिघडल्याने पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. चौकशीदरम्यान त्याना मळमळ, उलट्या, तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स बोलावून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ त्याना ऑक्सिजनवरही ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या पथकाने प्राथमिक तपासणी करून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच खरात याच्या वकिलांनी त्याला न्यूरोलॉजिकल त्रास असल्याचं सांगत न्यूरोसर्जनकडे नेण्याची मागणी न्यायालयात केली होती. त्यानंतरच अचानक प्रकृती खालावल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
दरम्यान, अशोक खरात याची पोलीस कोठडी उद्या संपणार असून, त्याआधी महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी SIT कडून तपास वेगाने सुरू आहे. उद्या त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार असून, कोठडी वाढवण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 22, 2026 10:30 AM
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi

