एकनाथ शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू चंपा सिंग थापा सोबत, शक्तिप्रदर्शन रॅलीत सहभागी होत म्हणाला….
ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघाकडे हायप्रोफाईल लढत म्हणून पाहिलं जातं. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज त्यांनी आपला अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावान सेवक चंपा सिंह थापा हे होता.
महाराष्ट्रात येत्या 20 नोव्होंबरला विधानसभा निवडणूक होणार असून विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर उद्या 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख आहे. अशातच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आतापर्यंत चारवेळा ते या विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठं शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाळासाहेबांचा विश्वासू चंपा सिंग थापा हा देखील होता. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा सेवक असलेल्या चंपा सिंह थापाशी संवाद साधला असता तो म्हणाला की, “मला चिक्कार आनंद होत आहे. पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार. मुख्यमंत्री नेहमी माझ्या मदतीला धावून येतात”, असा विश्वास व्यक्त केला.
Published on: Oct 28, 2024 03:47 PM
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
