औरंगाबादमध्ये दरोड्याचा थरार, चिखली अर्बन बँकेच्या गाडीवर दरोडा, पुढे अपघातात एकाला उडवलं

दरोडेखोरांनी चिखली अर्बन बँकेच्या गाडीवर दरोडा टाकला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ही घटना घडली. बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना मारहाण इनोव्हा गाडी करत पळवली. गाडी घेऊन पाळणाऱ्या दरोडेखोरांचाही अपघात झाला.

औरंगाबाद : दरोडेखोरांनी चिखली अर्बन बँकेच्या गाडीवर दरोडा टाकला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ही घटना घडली. बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना मारहाण इनोव्हा गाडी करत पळवली. गाडी घेऊन पाळणाऱ्या दरोडेखोरांचाही अपघात झाला. पळून जाण्याचा प्रयत्नांत दरोडेखोरांनी दुचाकीला धडक दिली. इनोव्हाच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. अपघातानंतर गाडीसह दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. तर, चिखली अर्बन बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्री 1 वाजता घडली घटना असून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI