‘राम’ नामाचं FREE मध्ये टॅटू, रामलल्लाच्या भक्ताकडून कुठंय अनोखा उपक्रम?
नागपूरातील टॅटू आर्टिस्ट रितीक राजेंद्र दरोडे यांच्याकडून ‘जय श्री राम’चे निःशुल्क टॅटू रामभक्ताच्या हातावर काढून दिले जात आहे. २ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत हा टॅटू रामभक्तांना अगदी फ्रीमध्ये आपल्या हातावर काढून मिळणार आहे.
नागपूर, ८ जानेवारी २०२४ : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्येतील ज्या राम मंदिराची आस प्रत्येक भारतीयाला होती ती आस आता अवघ्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात राममय वातावरण झालं आहे. देशभरात अनेक जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम आणि तयारी केली जात आहे. अशातच नागपुरात एका राम भक्ताचा अनोखा उपक्रम पाहायला मिळत आहे. नागपूरातील टॅटू आर्टिस्ट रितीक राजेंद्र दरोडे यांच्याकडून ‘जय श्री राम’चे निःशुल्क टॅटू रामभक्ताच्या हातावर काढून दिले जात आहे. २ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत हा टॅटू रामभक्तांना अगदी फ्रीमध्ये आपल्या हातावर काढून मिळणार आहे. आतापर्यंत २०० हून अधिक रामभक्तांना टॅटू आर्टिस्ट रितीक राजेंद्र दरोडे यांनी हे ‘जय श्री राम’चे निःशुल्क टॅटू काढून दिले आहे. हा टॅटू ज्यांना काढायचे असेल त्यांना आधी बुकिंग करावे लागते मग त्यांना टॅटू काढून दिला जातो.
Published on: Jan 08, 2024 02:27 PM
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
