OBC Babanrao Taywade : …तर संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार, जरांगेंच्या आंदोलनादरम्यान OBC महासंघाचा गंभीर इशारा
राष्ट्रीय ओबीसी महासंग्रह 30 ऑगस्ट पासून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू करणार आहे. हे उपोषण ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेतील अनियमिततेवर नियंत्रण आणण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, ओबीसी समाजातील चिंता वाढत आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी याबाबत एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन होतंय तर दुसरीकडे जरांगेंसमोर सरकार झुकणार का? याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हंटलंय तर आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा टोकाचा इशारा देखील बबनराव तायवाडे यांनी दिलाय. जर सरकार मनोज जरांगे यांच्या मागण्यांसमोर झुकले तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका निर्माण होईल. त्यामुळे या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी आणि सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी एक ठोस पाऊल ओबीसी समाजाकडून उचलण्यात आले आहे. येत्या 30 ऑगस्टपासून नागपुरातल्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंग्राचा साखळी उपोषण सुरू करणार असल्याचं सुद्धा तायवाडे यांनी जाहीर केलंय
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

