Beed Audio Clip Viral | बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर, वाल्मिक कराड..
बीड कारागृहातून आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. मारहाणीच्या प्रकरणातील अझर पठाण याची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यामध्ये त्याने गंभीर आरोप केले आहेत. अझर पठाणच्या म्हणण्यानुसार, त्याच्यावर दबाव टाकून ऑडिओ क्लिप तयार करण्यास भाग पाडण्यात आलं. तसेच, मस्साजोग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण प्रकरण घडत असल्याचा दावा त्याने केला आहे.
बीड कारागृहातून आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. मारहाणीच्या प्रकरणातील अझर पठाण याची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यामध्ये त्याने गंभीर आरोप केले आहेत. अझर पठाणच्या म्हणण्यानुसार, त्याच्यावर दबाव टाकून ऑडिओ क्लिप तयार करण्यास भाग पाडण्यात आलं. तसेच, मस्साजोग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण प्रकरण घडत असल्याचा दावा त्याने केला आहे. या प्रकरणात जरंगे पाटील यांचा कोणताही संबंध नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. यासोबतच, वाल्मिक कराड यांना लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठीच हा सर्व प्रकार रचला जात असल्याचा आरोप अझरने केला आहे. “आम्हाला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असंही त्याने या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं असून, संबंधित आरोपांबाबत अधिकृत तपास आणि सत्यता समोर येणं आवश्यक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Apr 23, 2026 04:39 PM
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ

