हरियाणात गेम पलटला, काँग्रेसला धक्का बसणार? भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल
Haryana Assembly Election Result : हरियाणात विधानसभा निवडणूक निकाल समोर यत आहे. यामध्ये मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळपासून आघाडीवर असणारी काँग्रेल बहुमताच्या दिशेने गेली होती पण अचानक पिछाडीवर गेली. तर दुसऱ्या राऊंडनंतर भाजपने अचानक जोरदार मुसंडी मारली.
हरियाणा विधानसभा निवडणुकांचे हळू हळू समोर येत आहे. हरियाणातील आतापर्यंत जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली तर भाजपने पण जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. एकूणच हरियाणात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, भूपिंदर सिंह हुड्डा, रणजीत सिंह चौधरी, दुष्यंत चौटला, विनेश फोगाट यांच्यासह अनेक दिग्गजांपैकी जनतेची पसंती कोणाला याचा फैसला अवघ्या काही तासात समोर येणार आहे. हरियाणामध्ये गेल्या दहा वर्षात भाजपची सत्ता असल्याने यंदा कोणाचं सरकार स्थापन होणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. दहा वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या हरियाणामध्ये भाजप ४५, काँग्रेस ३४, जेजेपी ०० आणि इतर ०७ जागांवर आहे. मतमोजणी सुरु होताच काँग्रेसने आघाडी घेऊन राज्यात आपला दबदबा असल्याचे संकेत दिले होते. पण मतमोजणीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये अचानक गेम पलटल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ
Published on: Oct 08, 2024 11:30 AM
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
